१० दिवसांपासून समुद्रात अडकलेल्या १४ मच्छिमारांना तटरक्षक दलाने वाचवले


१० दिवसांपासून समुद्रात अडकलेल्या १४ मच्छिमारांना तटरक्षक दलाने वाचवले
SHARES

गेल्या १० दिवसांपासून खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या एका मासेमारी नौकेतील १४ मच्छिमारांची तटरक्षक दलाने सुखरूप सुटका केली आहे. 

'सीगल' नावाची मासेमारी नौका अरबी समुद्रात अडकल्याचा 'डिस्ट्रेस' संदेश रविवारी १७ सप्टेंबरला तटरक्षक दलाला मिळाला होता. "आम्ही मुंबई पासून २०० किलोमीटर अंतरावर समुद्रात अडकलो असून आमच्या बोटीचं इंजिन बंद पडलं आहे, आम्ही समुद्रात भरकटत चाललो आहोत'', असं या बोटीकडून सांगण्यात आलं. त्यानंतर तटरक्षक दलाने तात्काळ 'समुद्र प्रहरी' नावाची बोट या मासेमारी नौकेच्या मदतीला पाठवली. 



खवळलेल्या समुद्रातील परिस्थिती अतिशय खराब होत होती. एकीकडे ५० नॉटिकल प्रती तास वेगाने वारे वाहात होते, तर दुसऱ्याबाजूला दृष्यमानता (व्हिसिबिलीटी) ही ५०० मीटरवर आली होती. अशा परिस्थिती 'सीगल'ला शोधण्यास तट रक्षक दलाला देखील २ दिवस लागले. त्यानंतर मासेमारी नौकेशी संपर्क करण्यात आला. 



या १० दिवसांत मासेमारी नौकेतील पाणी आणि अन्न संपल्याने १४ मच्छिमार मदतीच्या प्रतीक्षेत होते. 'समुद्र प्रहरी'ने 'सीगल 'चा यशस्वी शोध घेतल्यानंतर मच्छिमारांना या बोटीतून त्वरीत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांच्या बोटीला मागे बांधून ससून डॉकला सुखरूप आणण्यात आल्याची माहिती तट रक्षक दलाने दिली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा