गौरीशंकर मिठाईवाल्याविरोधात एफडीएकडं कारवाईची मागणी

मुंबईतील परळ येथील प्रसिद्ध गौरीशंकर मिठाईवाला या दुकानात हा धक्कादायक प्रकार घडला होता.

गौरीशंकर मिठाईवाल्याविरोधात एफडीएकडं कारवाईची मागणी
SHARES

मुंबईत मंगळवारी व बुधवारी पावसानं तुफान बॅटिंग केली. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग पाण्याखाली गेले होते. मुंबईच्या परळ, हिंदमाता, लालबाग, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, मालाड, अंधेरी येथील सखल भागात कंबरेपर्यंत पाणी तुंबलं होतं. पाणी ओसरत नसल्यामुळं मुंबईकरांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत होता. मात्र याचवेळी एका प्रसिद्ध दुकानदरानं मुंबईकरांच्या आरोग्याच्या विचार न करता साचलेल्या पाण्यात आपल्या दुकानाचा काहीसा भाग धुतला. मुंबईतील परळ येथील प्रसिद्ध गौरीशंकर मिठाईवाला या दुकानात हा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ अनसुरकर यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला तक्रार दिली असून, गौरीशंकर मिठाईवाल्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गौरीशंकर मिठाईवाल्याचे काही अधिकारी मिठाई ठेवली जाणारी कपाटं आणि साहित्य साचलेल्या पाण्यानं धुवत होते. या व्हिडिओमुळं मुंबईकरांनी या मिठाईवाल्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईत मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसामुळं मुंबई तुबली होती. त्यामुळं मुंबई महापालिकेकडून पाणी उपसण्याचे काम सुरू होत. अनेक ठिकाणी पंप लावून पाणी उपसले जात होतं.

पावसाचं पाणी दुकानात शिरल्यानं अनेक दुकानदारांची नाचक्की झाली होती. तर एका ठिकाणी परळ येथील प्रसिद्ध गौरीशंकर दुकानातील कर्मचारी साचलेल्या पाण्यानं दुकान धुवत होते. या प्रकारामुळं मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण उपस्थित होऊ शकतो. त्यामुळं अनसुरकर यांनी महापालिकेच्या एफ दक्षिण विभाग, आरोग्य विभागाकडं तक्रार केली होती. परंतु, महापालिका याकडं दुर्लक्ष करत असल्याचं अनसुरकर यांनी एफडीएकडं तक्रार करून गौरीशंकर मिठाईवाल्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित विषय