संभाजी भिडेंविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्याविरोधात भोईवाडा पोलिसांत गुन्हा नोंदवण्याबाबत लेखी तक्रार करण्यात आली आहे.

संभाजी भिडेंविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार
SHARES

मुंबईतील एका नामंकित वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे.


वादग्रस्त विधानांची जंत्री

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे सध्या आपल्या विविध वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. भिडे यांनी १६ जुलै रोजी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेचा संबध मनूस्मृर्ती या ग्रंथाशी जोडला होता.



तक्रारीत मागणी काय?

भिडेंनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेचा अपमान झाला आहे. भिडे जातीय तेढ निर्माण करून समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वाघमारे यांनी लेखी तक्रारीत केला आहे. त्यामुळे भिडेंविरोधात तक्रार नोंदवून त्यांना त्या गुन्ह्यात अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



हेही वाचा-

भिडेंच्या आंबा, मनूप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका!

भिडेंच्या आंबरसाला राजचा व्यंगचित्रातून टोला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा