Advertisement

भिडेंच्या आंबा, मनूप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका!

वादग्रस्त वक्तव्य करत भिडे यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर केल्यानं त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी, अशी मागणी याचिकेद्वारे केल्याची माहिती अॅड. सातपुते यांनी मुंबई लाइव्हला दिली.

भिडेंच्या आंबा, मनूप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका!
SHARES

''माझ्या शेतातला आंबा खाल्यानं मुलं होतात आणि मनूनं देशाला पहिली घटना दिली, मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामापेक्षा दोन पावलं पुढं होता'', असं वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात अखेर गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.


कुणी केली याचिका?

अॅड. नितीन सातपुते यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त वक्तव्य करत भिडे यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर केल्यानं त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी, अशी मागणी याचिकेद्वारे केल्याची माहिती अॅड. सातपुते यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


देशभरात वाद

माझ्या शेतातला आंबा खाल्यानंतर मुलं होतात या भिडेंच्या वक्तव्यानंतर राज्यातच नव्हे, तर देशभरात चांगलाच वाद पेटला होता. भिडेंच्या या वादग्रस्त विधानाची नाशिक महापालिकेनं चौकशी केली. त्यानंतर या वक्तव्यात तथ्य आढळल्याचं म्हणत नाशिक महापालिकेनं भिडे यांना उत्तरासाठी नोटीसा पाठवल्या. पण त्या नोटीसा भिडेंनी स्वीकारल्या नाहीत. तर या नोटीशीनुसार १५ दिवसांत उत्तर न आल्यास गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं. पण अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.


गुन्हा दाखल झालाच नाही

दुसरीकडं भिडेंचं वादग्रस्त वक्तव्यांचं सत्र सुरूच आहे. मनूनं पहिली घटना दिली, मनू हा संतांपेक्षा एक पाऊल पुढं होता असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही भिडेविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळं कुठंतरी भिडेंना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही अॅड. सातपुते यांनी केला आहे.


सुनावणीकडे लक्ष

वादग्रस्त वक्तव्य करत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या भिडेविरोधात काहीच कारवाई होत नसल्यानं आपल्याला न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचंही अॅड. सातपुते यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानुसार गुरूवारी अॅड. सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत भिडे यांच्या भाषणांवर अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन घालण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर आता लवकरच सुनावणी होणार असल्यानं आता सर्वांचच लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे.



हेही वाचा-

मुख्यमंत्र्यांची संभाजी भिडेंना क्लिनचीट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा