Advertisement

मुख्यमंत्र्यांची संभाजी भिडेंना क्लिनचीट

भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी एल्गार मोर्चा काढून सरकारला अल्टिमेटम दिला. आंबेडकर यांच्या इशाऱ्यानंतर भिडे यांना अटक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भिडे यांच्याविरोधात कुठलेही पुरावे नसल्याने त्यांना अटक केलेली नाही, असं म्हणत क्लिनचीट दिली.

मुख्यमंत्र्यांची संभाजी भिडेंना क्लिनचीट
SHARES

कोरेगाव-भीमा इथं घडलेल्या हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेंना अटक झाल्यानंतर संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करताना भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी एल्गार मोर्चा काढून सरकारला अल्टिमेटम दिला. आंबेडकर यांच्या इशाऱ्यानंतर भिडे यांना अटक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भिडे यांच्याविरोधात कुठलेही पुरावे नसल्याने त्यांना अटक केलेली नाही, असं म्हणत क्लिनचीट दिली.

विधानसभेत विरोधकांनी २९३ अन्वये मांडलेल्या कायदा व सुव्यवस्था प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही क्लिनचीट दिली.


काय म्हणाले मुख्यमंत्री?

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्याच्या अनुषंगाने भिडे यांचा या प्रकरणात सहभाग तपासण्यात आला, त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. मात्र या तपासात त्यांचा हिंसाचार प्रकरणात कुठलाही सहभाग असल्याचं आतापर्यंत आढळून आलं नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला.


घटनेशी संबंध नाही

कोरेगाव-भीमा इथल्या विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या दलितांवर हल्ला करण्यात आला होता. त्या अनुषंगाने एका महिलेने संभाजी भिडे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासात १ जानेवारी किंवा त्या आधी संभाजी भिडे यांचा कोरेगाव-भीमा इथल्या स्थानिकांशी कुठलाही संबध आढळून आला नाही. तसंच ते इथल्या कुणालाही ओळखत नसल्याचं तपासात उघड झालं.


आंबेडकरांना माहिती दिली

सोमवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भेटायला आलेल्या शिष्टमंडळाला आम्ही ही बाब सांगितली आहे. त्यावेळी अॅड. आंबेडकर यांनी या अनुषंगाने आणखी नवे पुरावे सादर करणार असल्याचं सांगत एका फेसबुक पोस्टवरील माहिती दिली. त्या अनुषंगानेही आणखी तपास करणार असून येत्या ८ दिवसांत ही कारवाई पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितलं.


मुख्यमंत्री दिशाभूल करताहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात केलेलं निवेदन हे सर्वांची दिशाभूल करणारं आहे. भिडे यांनी या हिंसाचारात प्रत्यक्ष उतरून दगडफेक केली नसली, तरी त्यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधारेच आम्ही त्यांना अटक करण्याची मागणी केली. सरकारने त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करावं, न्यायालय म्हणेल, ते आम्हाला मान्य असेल. पण सरकारने न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नये. त्यांच्या समर्थकाने केलेल्या फेसबुक पोस्टची चौकशी करून ८ दिवसांत ताबडतोब निर्णय घ्या आणि पुढच्या विधानसभा अधिवेशनापर्यंत त्यांना अटक करा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून केली.
- प्रकाश आंबेडकर, भारिप

तूर्तास तरी मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांना क्लिनचीट दिल्याने त्यांच्या अटकेची शक्यता धूसर झाल्याचंच दिसत आहे.हेही वाचा-

संभाजी भिडे मोकाट का? विरोधकांचा सवाल

भायखळ्याऐवजी आझाद मैदानावर कार्यकर्त्यांचा एल्गारRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा