मॉडेलवर अत्याचार करणारा आरोपी फरार

 Bangur Nagar
मॉडेलवर अत्याचार करणारा आरोपी फरार

मालाड - मालाड पोलिसांच्या हद्दीतही एका मॉडेलवर अत्याचार आणि मारहाण झाल्याचं समोर आलंय. आरोपीनं हा प्रकार यापूर्वीही केला असून तो कुख्यात हॅकरही असल्याचं सांगितलं जातंय. त्याचं नाव दीपक मलिक असून तो अजूनही फरार आहे. त्याच्याविरोधात मालाड, ओशिवरा आणि वाकोला पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. ओशिवरा येथील बलात्काराच्या गुन्ह्यासाठी तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मॉडेलनं एका साबणाच्या जाहिरातीत काम केलंय. तिच्या जबाबानुसार आरोपीवर बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फेसबुकवर झिशान मलिक नावाचं अकाउंट ओपन करून मॉडलिंग करणाऱ्या मुलींना फसवायचा. त्यांना लग्नाचं अामीष दाखवून अत्याचार करायचा. 3 वर्षांपूर्वीही ओशिवरा येथे एका मॉडेलनं त्याच्याविरोधात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तसंच गुजरातमधील बिझनेसमॅनचं अकाउंट हॅक करून लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्याबद्दलही त्याला अटक झाली होती.

Loading Comments