• 'तिला' शोधण्यात पोलिसांना यश
  • 'तिला' शोधण्यात पोलिसांना यश
  • 'तिला' शोधण्यात पोलिसांना यश
  • 'तिला' शोधण्यात पोलिसांना यश
  • 'तिला' शोधण्यात पोलिसांना यश
SHARE

मुलुंड - सोमवारी अपहरण झालेल्या नेहाला शोधण्यात आणि अपहरणकर्त्यांना पकडण्यात मुलुंड पोलिसांना यश आलं आहे. सोमवारी संध्याकाळी 8.30 च्या सुमारास मुलचंद रामलाल धुरिया यांच्या 4 वर्षाच्या मुलीचं अपहरण झालं होते. त्यानंतर मंगळवारी भाऊबीजच्या दिवशी मुलुंड पोलिसांनी अपहरण कर्त्यांना पकडलं. मात्र दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

सोमवारी संध्याकाळी फटाके फोडत असताना अपहरणकर्त्यांनी मुलीला चॉकलेटचं अामिष दाखवत पळवून तीन हाथ नाक्यावर नेले आणि तिथून एका टेम्पोच्या साहाय्यानं मुंब्रा रेती बंदर येथे नेलं. पालकांनी मुलगी सापडत नाही म्हणून तात्काळ पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी ताबडतोब शोधकार्य सुरू करताच दोन संशयितांना ताब्यात घेतलं. पोलिसी हिसका दाखवताच अपहरणकर्त्यातल्या एकानं सर्व गोष्टी मान्य केल्या. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू करत रेती बंदर येथे छापा टाकला. तेव्हा पोलिसांनी मुलीला सोडवत दिलीप मणिराम धुरिया (33), तुफान बिहारीलाल निषाद (33), मोहम्मद शहाजाद शाह (33), श्रीमती संगीता महादेव लगाडे (50), मंगल शंकर चंदनशिवे (26), ममता दिपक राज (21) यांना अटक केली.
त्यांच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे, की या छोट्या मुलीची त्या नराधमांनी 50 ते 60 हजारात विक्री करण्याचं ठरवलं होतं. याचे त्यांनी 5 हजार आगाऊ रक्कमही घेतली होती. पण मुलुंड पोलिसांची मेहनत यामुळे ती मुलगी सुखरूप घरी आली, अशी माहिती पोलीस उप आयुक्त राजेश प्रधान यांनी बुधवारी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषद दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या