लॉक डाऊनमुळे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला लगाम, महिन्याभरात फक्त 7 प्रकरणं

लाँकडाऊनमुळे मुंबईतल्या गुन्हेगारीत 67% घट

लॉक डाऊनमुळे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला लगाम, महिन्याभरात फक्त 7 प्रकरणं
SHARES
कोरोना वायरसमुळे पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊनचे दुष्यपरिणाम अनेक ठिकाणी दिसून आले असले. तरी लाँकडाऊनचा फायदा ही नकळत झालेला आहे. लाँकडाऊनमुळे मुंबईतल्या गुन्हेगारीत 67% घट झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील भ्रष्टाचार 83% कमी झाल्याचे आकडेवारीतून पुढे आले आहे. लाचलुचत प्रतिबंधक विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल आणि मे या दोन महिन्यात फक्त 13 गुन्ह्यांची नोंद झाली असून 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


 
कोरोना वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र 9 मार्च  पासून पूर्णतहा लाँकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनचा सरकारी व निमशासकीय विभागांच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला. कार्यालये बंद असल्यामुळे भ्रष्टाचारात कमालीची घट झाली. तर नागरिक घरातच अडकल्यामुळे घरफोड्या, सोनसाखळी चोरी, पाकीटमारी याचे प्रमाण ही कमी झाले. नुसत्या मुंबईत 188 वगळता, इतर गुन्हगारीचे प्रमाण तब्बल 67 टक्क्यांनी घटले आहे. त्याच प्रमाणे राज्यातील भ्रष्टाचाराला ही लगाम लागला आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात लाचखोरीची फक्त 7 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर मे महिन्यात 6 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. दोन्ही महिन्यात एकूण 13 प्रकरणं नोंदवण्यात आली असून 16 आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे.


गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लाचखोरीचे 58 गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामध्ये 77 आरोपींचा समावेश होता. तर मे महिन्यात 32 गुन्हे नोंदविण्यात आले, ज्यामध्ये 41 आरोपींचा समावेश होता. 2019 च्या या दोन महिन्यांची तुलना या वर्षाच्या महिन्यांशी केली गेली तर, एप्रिल 2020 मध्ये या प्रकरणांमध्ये 88 टक्के आणि मे मध्ये आतापर्यंत सुमारे 84 टक्के घट झाली आहे. यावर्षी जानेवारीपासून एसीबीने लाचखोरी प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी राज्यभरात 211 सापळे रचले आहेत, ज्यात 290 हून अधिक सरकारी अधिकारी आणि इतर लोकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्यात अशा 326 घटना घडल्या होत्या, ज्यात सुमारे 430 लोकांना अटक करण्यात आली होती. 2019 मधील याच कालावधीच्या तुलनेत जानेवारीपासून या प्रकरणांमध्ये एकूण 35 टक्क्यांहून अधिक घट झाली असल्याचे समजत आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा