'आम्ही_महाराष्ट्र_पोलीस' पोलिसांचेे मनोबल वाढवण्यासाठी सोशल मिडियावर नवा 'ट्रेंड'

सर्व सामान्यांसह सिने कलाकार, राजकिय नेते, खेळाडू अशा सर्वांनी महाराष्ट्र पोलिसांची लोगो त्यांच्या डिपीवर ठेवत. पोलिसांचेे मनोबल वाढवलेे

'आम्ही_महाराष्ट्र_पोलीस' पोलिसांचेे  मनोबल वाढवण्यासाठी सोशल मिडियावर नवा 'ट्रेंड'
SHARES
देशांत कोरोना संकटाने हाहाकार माजवला असून 24 तासात जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांवरचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 26 पोलिसांचा मृत्यू झाला असून  1421 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांचे खच्चीकरण होऊ नये, म्हणून सोशल मिडियावर पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी '#आम्ही_महाराष्ट्र_पोलीस' हा नवीन ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. 


महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. माञ अशा परिस्थितीत ही महाराष्ट्र पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. राज्यातील 1421 पोलिसांवर कोरोनाची बाधा झाल्याने उपचार सुरू आहे. तर या पोलिसांच्या संपर्कातील तब्बल 7 हजार पोलिसांना क्वारनटाईन केले आहे. तर राज्यात 26 पोलिसांचा या महामारीने जिव घेतला आहे. अशाने पोलिसांचेे खच्चीकरन होऊ नये, म्हणून सोशल मिडियावर #आम्ही_महाराष्ट्र_पोलिस या नावाने सोशल मिडियावर ट्रेड सुरू करण्यात आला आहे. या पूर्वी राज्याचे गृहमंञी अनिल देशमुख यांनी पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो सोशल मिडियावर डिपी ठेवण्याचेे आवाहन केले होतेे. त्याला नागरिकांनी उत्पूर्द प्रतिसाद दिली दिला. सर्व सामान्यांसह सिने कलाकार, राजकिय नेते, खेळाडू अशा सर्वांनी महाराष्ट्र पोलिसांची लोगो त्यांच्या डिपीवर ठेवत. पोलिसांचेे मनोबल वाढवलेे होते.


राज्यात कोरोना मुक्त झालेल्या पोलिसांमध्ये 83 पोलीस अधिका-यांसह 887 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 90 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या एक हजार 420 पोलिसांवर राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 7 हजार  पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  आतापर्यंत दोन हजार 211 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असली, तरी त्यातील निम्म्या पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणे ही अति सौम्य आहेत. तर  29 मे पर्यंत 970पोलीस कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. त्यात मुंबईत आतापर्यंत 1303 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 395 योद्ध्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे चार हजार 448 पोलिसांना विलगीकरण करण्यात आले आहे.

पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊनच गृहमंञी अनिल देशमुख यांनी केंद्रीय पथकाची मागणी केली होती. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत 22 जवानाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील दोन हजारांहून अधिक पोलिसांना कोरोना झाला आहे. तसेच संशयीत रुग्णाच्या संपर्कात आलेले सात हजार पोलिस विलगीकरणात आहेत. याशिवाय 55 वर्षावर्षीय पोलिसांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. तसेच 50 वयोगटावरील पोलिसांना कमी जोखीमीचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी सध्या 10 हजार होमगार्ड, 1200 केंद्रीय सुरक्षा जवान देण्यात आले आहेत. त्यामुळेे अपुऱ्या मनुष्यबळात ही पोलिसांनी राज्यात कायदा व सुवस्था टिकवून ठेवली आहे. हे खरचं कौतुकास्पद आहे. पोलिसांच्या या शौर्याचे सोशल मिडियावर #आम्ही_महाराष्ट्र_पोलिस या ट्रेंडद्वारे मनोबल वाढवलेे जात आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा