पोलीस आयुक्तांच्या उपाय योजनेनंतर कोरोना बाधीत पोलीसांच्या संख्येत घट

परमबीर सिंग यांंनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्यास काही नियम व सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत काही उपाय योजना काही दिवसांपूर्वी करण्याचे आदेश दिले होते. त्याचाच परिणाम की काय आठवड्याभरात पोलिस दलातील कोरोना बाधीत पोलिसांच्या संख्येत कमालीची घट

पोलीस आयुक्तांच्या उपाय योजनेनंतर कोरोना बाधीत पोलीसांच्या संख्येत घट
SHARES
कोरोनाविरुद्ध लढण्यात डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पोलिस उभे आहेत. अपुरे मनुष्यबळ, कटेंन्मेंट झोन मधील बंदोबस्त, 24 तास सेवा आणि वाढणारे रुग्ण... सभोवताली परिस्थिती गंभीर असूनही मुंबई पोलिस स्वत: चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत.  नागरिकांच्या थेट संपर्कात आल्यामुळेच मुंबई पोलिस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढेे आल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांंनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्यास काही नियम व सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत काही उपाय योजना काही दिवसांपूर्वी करण्याचे आदेश दिले होते. त्याचाच परिणाम की काय आठवड्याभरात पोलिस दलातील कोरोना बाधीत पोलिसांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.

कोरोनाबाधीत पोलिस रुग्णांमध्ये सर्वाधिक मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या आहे.  मुंबई पोलिस दलात आतापर्यंत 1871कोरोनाबाधित पोलिसांची नोंद करण्यात आली आहे. त्यात 1612 पोलिस कर्मचारी, तर 259 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील 571 जणांना कोविड सेॆटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर 231 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 31 जणांना घरीच क्वारनंटाइन करण्यात आले आहे. तर 164 जणांना नुकताच डिचार्ज देत होम क्वारनंटाइन करण्यात आले आहे. तर 634 जण या पू्र्वीच बरे झाले असून सध्या ते घरी क्वारनटाइन आहेत. तर आतापर्यंत 219 जण पूर्णतहा बरे होऊन सेवेत पून्हा हजर झालेले आहे. तर दुर्दैवाने 21 जणांचा या महामारीने मृत्यू झालेला आहे.

माञ पोलिसांमधला कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढलाा आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येत असल्याने पोलिसांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसारच पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी पोलिस ठाण्यात प्रवेश करण्यापूर्वी तक्रारदाराला सँनिटायझरने हात स्वच्छ करण्यात यावे. त्याच बरोबर तक्रारदार तक्रार नोंदवण्यासाठी अधिकार्याच्या टेबलावर गेल्यास दोघांमध्ये सुरक्षित अंतर असावे. त्याच बरोबर दोघांच्या ही मध्ये पारदर्शक काच बसवण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रत्येक पोलिस ठाण्यात ग्लोज, मास्क आणि सँनिटायझरचे वाटप केले आहे.


आयुक्तांच्या याच नियमावलीचे परिणाम आता दिसू लागले आहॆत. राज्यात कोरोनाबाधित 1431 पोलिसांमध्ये 802 हे मुंबईतील पोलिसांची संख्या आहे. आठवड्या भरापूर्वी हाच आकडा एक हजाराच्यावर होता. आनंदाची बाब म्हणजेे मागील काही दिवसात पोलिस दलात हाताच्या बोटावर मोजण्या इतके  पोलिस कोरोनाने संक्रमित होत आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा