कोरोनाबाबत खोटी माहिती देणाऱ्या 600 पोस्ट सायबर पोलिसांनी हटवल्या


कोरोनाबाबत खोटी माहिती देणाऱ्या 600 पोस्ट सायबर पोलिसांनी हटवल्या
SHARES
देशात सध्या कोरोना या संसर्ग रोगाने आधीच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना, सोशल मिडियावर चुकीच्या अफवा पसरवणाऱ्या 600 पोस्ट पोलिसांनी आतापर्यंत काढून टाकल्या आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर आतापर्यंत राज्य सायबर पोलिसांनी 333 गुन्हे नोंदवलेले आहेत. राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत मुंबईत 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर राज्य सायबर विभागानेही अशा 600 पोस्ट हटवल्या असून याप्रकरणी 115 व्यक्तींना अटक केली आहे.
 

या गुन्हेगारांना व समाजकंटकांवर  गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर  सायबर विभाग समन्वय साधून काम करत आहे. या करिता विभाग  टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांवर अचूक लक्ष ठेवून आहे.  मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 ची सोशल मीडिया लॅबही अशा आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेऊन आहेत. त्यातील 550 पोस्ट आतापर्यंत हटवण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. त्यात खोटी माहिती पसरवणारे व्हिडियो, कोरनाबद्दलची खोटी माहिती, समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट, प्रक्षोबक पोस्ट यांचा समावेश आहे.  

समाज माध्यमांसाठी अद्ययावत टीम 
प्रक्षोभक पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी विशेष शाखेत कार्यरत 30 पोलिसांचे पथक 24 तास संशयीत पोस्टची तपासणी करत असतात. अत्यंत अद्ययावत प्रशिक्षीत असलेले हे दल अद्ययावत सॉफ्टवेअर, फिल्टर व टुल्सनी सज्ज आहेत. प्रक्षोभक पोस्टमुळे सुरक्षेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी अधिकाधिक संशयीत पोस्टची तपासणी केली जाते. पण इंटरनेटचे जाळे एवढे मोठे आहे, की प्रत्येक संदेश, व्हीडिओवर लक्ष ठेवणे शक्‍य होत नाही. पण एका छोट्या संदेशामुळेही जनभावना दुखावल्या गेल्या, तर वाद उद्भवू शकतात. त्यामुळे 30 पोलिसांचे हे पथक तीन पाळ्यामध्ये 24 तास काम करते. फेसबुक,ट्‌वीटर, टिकटॉक, इन्टाग्राम, यू ट्यूब, टेलिग्राम आदीं समाजमाध्यमांवरील संदेशांचे विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासणी केली जाते. त्यासाठी ऍडव्हान्स फिल्टरचा वापर केला जातो. त्यात संशयीत संदेश सापडल्यास तात्काळ सर्विस पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून तो ब्लॉक करण्यात येतो. कॉम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम(सीईआयटी), दहशतवाद विरोधी पथकं व इतर सुरक्षा यंत्रणांमार्फत या पथकाला नियमीत प्रशिक्षण दिले जाते. इंटरनेटवर येणारे नवे तंत्रज्ञान व दहशतादी वापरत असलेले नव्या संकल्पना यांची माहिती देण्यात येते. गुगलवर ज्याप्रमाणे एखादा शब्द टाईप केल्यानंतर शब्द टाईप केल्यानंतर त्याच्या संबंधीत शब्द असलेल्या लिंक येतात. त्याप्रमाणेच हे फिल्टर काम करतात.

राज्य सायबर विभागानेही हटवल्या 60पोस्ट 
द कोरोनाच्या पार्श्वभूमिवर  सोशल मिडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी राज्य सायबर विभागाने आता कठोर पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहेत. व्हॉटस अँपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्या ग्रुपच्या अँडमिनवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सायबर पोलिस उपमहानिरीक्षक हरीष बैजल यांनी स्पष्ट केले होते. 333 गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत  115 गुन्हे प्रक्षोभक व्हिडिओप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाविषयी अफवा पसरवणारे 75 प्रकरणं तर चुकीची माहिती देण्याचे 24 प्रकार उघड झाले आहेत. राज्य सायबर विभागानेही 60 आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या असून आतापर्यंत 115 जणांना अटक केली आहे
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा