Lockdownextention: लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ११ हजार गुन्हे दाखल


Lockdownextention: लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ११ हजार गुन्हे दाखल
SHARES
राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील 1 लाख 11  हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या 244 घटना घडल्या. त्यात 823 व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  लॉकडाऊन चौथ्यांदा वाढवण्यात आले असले, ज्या त्या जिल्ह्यांची आणि परिसरांची परिस्थितीनुसार तेथे शिथिलता
देण्यात आली आहे. माञ तरी ही काही ठिकाणा विनाकारण बाहेर पडणारे, सामाजिक नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्या आज ही कमी नाही. अशा बेजबाबदार व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा नोंदवत कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी 22 मार्च ते 17 मे या कालावधीत  कलम 188 नुसार  1 लाख 11 हजार 412 गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी 22 हजार 492  व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 4 कोटी 56 लाख 51 हजार 104 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.


 नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन

पोलीसांच्या 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो.  लाँकडाऊन च्या काळात  या 100 नंबर वर  मदतीसाठी हजारो फोन येत आहेत.  कोरोना संदर्भात आलेल्या 95 हजार 291 फोनवरील व्यक्तींच्या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा 680 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण 4 लाख 7 हजार 342 व्यक्ती Quarantine  असल्याची माहिती गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिली आहे. तर अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत 4 लाख 12 हजार 359 पासचे वाटप करण्यात आले आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1317 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 59 हजार 363 वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 


पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील 11 पोलीस कर्मचारी व 1 अधिकारी एकूण 8,पुणे 1, व सोलापूर शहर 1, नाशिक ग्रामीण 1 अशा 13 पोलिसंाना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात एकूण 3798 रिलिफ कँम्प आहेत. तर जवळपास 3 लाख 65 हजार 179 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा