Coronavirus pandemic: राज्यभरात 1 हजारहून जास्त पोलिस कोरोना बाधित

पोलिसासाठी सांताक्रुझ वाकोला पोलीस वसाहतीतील एक इमारत कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात

Coronavirus pandemic:  राज्यभरात 1 हजारहून जास्त पोलिस कोरोना बाधित
SHARES
लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कोरोनाविरुद्ध् लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला असुन, राज्यात आतापर्यंत 1हजार 7 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.  एकट्या मुंबईत 250 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलीस कर्मचा-यांचा  मोठ्या प्रमाणांत समावेश आहे. राज्यात 901पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय 106 पोलिस अधिका-यांही कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत सात पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 113कोरोना बाधीत पोलिस उपचार घेऊन घरी परतले असून सध्या 887 पोलिसांवर कोरोनावर उपचार घेत आहेत.

मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. मुंबईत सुमारे 309 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचा-यांसह पोलीस अहोरात्र मेहनत घेत रस्त्यावर उभे आहेत. कोरोनाने पोलिसांनाही विळखा घातला आहे. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन पोलिस आयुक्तलयात सुरू करण्यात आली आहे. त्यावर बहुतांश पोलिस व कुटुंबियांनी रुग्णालयात भरती करण्यात येणा-या अडचणीबाबत तक्रार केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना अशा अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी पोलिसासाठी सांताक्रुझ वाकोला पोलीस वसाहतीतील एक इमारत कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी जवळपास300 बेडची व्यवस्था केली गेली आहे. याशिवाय पोलिस ठाण्याच्या पातळीवर मुंबईबाहेर राहणा-या पोलिसांची राहण्याची सुविधा करण्याबाबतही प्रक्रिया सुरू असून पोलिस ठाण्यात तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच मरोळ येथेही अशाच पद्धतीने एका इमारतीचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. तसे झाल्यात तेथेही 250 बेड्स कोरोनाबाधीत पोलिसांसाठी उपलब्ध होतील

पोलिसांवरील हल्ले काही थांबेनात...

पोलिसांवर हल्ल्याच्या 207, तर वैद्यकीय कर्मचा-यांवर 33 हल्ल्यांच्या घटना
राज्यभरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 207 प्रकरण घडली असून त्यात 747 नागरीकांना अटक करण्यात आले आहे.  मालेगावमध्ये नुकताच काही नागरीकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. मुंबईतील गोवंडी येथेही पोलिसांवर हल्ल्याच्या दोन घटना घडल्या होत्या.मरिन ड्राईव्ह येथे नाकाबंदी दरम्यान 27 वर्षीय तरुणाने तीन पोलिसांवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी तरूणाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .वैद्यकीय कर्मचा-यांवर हल्ल्याच्या 33 घटना राज्यभर घडल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांना शोधणे, त्यांच्यावर उपचार करणे ही कामे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यावरही हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा