24 तासात राज्यात 61 पोलिस कोरोनाच्या विळख्यात


24 तासात राज्यात 61 पोलिस कोरोनाच्या विळख्यात
SHARES
लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कोरोनाविरुद्ध् लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला असुन, राज्यात गेल्या 24 तासांत 61 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आता एकूण  1061 पोलिस कोरोनाबाधीत आहेत. एकट्या मुंबईत 309 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलीस कर्मचा-यांचा  मोठ्या प्रमाणांत समावेश आहे. याशिवाय 112 पोलिस अधिका-यांही कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत  नऊ पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 174 कोरोना बाधीत पोलिस उपचार घेऊन घरी परतले असून सध्या 878 पोलिसांवर कोरोनावर उपचार घेत आहेत.

मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. सध्या मुंबईत 309 कोरोनाग्रस्त पोलिस उपचार घेत आहेत. शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सहाक पोलिस ठाण्यातील 24 पोलिसांचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यापूर्वी जुहू, वाकोला, वडाळा, जे.जे. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत रुग्ण सापडलेल्या पोलिस वसाहतीतील काही इमारतीही सील करण्यात आल्या होत्या.


राज्यभरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 218 प्रकरण घडली असून त्यात 770 नागरीकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्यात 84 पोलिस आणि 1 होमगार्ड जखमी झाला आहे. मुंबईत अँन्टाँप हिल येथे गुरूवारी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर काही नागरीकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. यासह विनाकारन बाह्र फिरणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींची 58 हजार 291 वाहन पोलिसांनी आतापर्यंत हस्तगत केली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा