142 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात


142 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात
SHARES
लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कोरोनाविरुद्ध् लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला असुन, राज्यात आतापर्यंत 1हजार 1 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.  एकट्या मुंबईत 307 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये पोलीस कर्मचा-यांचा  मोठ्या प्रमाणांत समावेश होता.  माञ कोरोनावर मात करण्यात पोलिस ही यशस्वी ठरले आहेत. आतापर्यंत 142 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून त्यात 18 अधिकारी आणि 124 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


राज्यात 1001 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत आठ पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  सध्या 851 पोलिसांवर कोरोनावर उपचार सुरू असून उर्वरित कर्मचाऱ्यांना कोरोनाची अतिसौम्य लागण झाली आहे. माञ पोलिसांमध्ये कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे. शेकडो पोलिसांमध्ये करोनासदृश लक्षणे दिसत असून, राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे.


माञ तरी ही नागरिकांच्या रक्षणासाठी पोलिस आज ही न घाबरता उभे आहेत. तर अनेक पोलिस या आजारातून बरे होऊन पून्हा ड्युटीवर हजर झाले आहेत. अशा पोलिसांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. अशा पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी एकीकडे आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरले असताना. शासनाकडून ही कोरोनाला बळी पडलेल्या आणि त्यातून पूर्णतहा बरे झालेल्या पोलिसांना विशेष आर्थिक मदत केली जात आहे. आतापर्यंत 142 कर्मचारी कोरोना या संसर्ग रोगावर मात करून घरी परतले आहेत. कोरोना झालेल्या आणि त्यावर मात करून परतलेल्या पोलिसांना 10 हजार रुपये प्रशांसापाञ रक्कम म्हणून जमा केली जात आहे. आतापर्यंत गृहविभागाने 25 लाख 80 हजार रुपये कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिसांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार प्रमाणे जमा केले असल्याची माहिती गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा