आतापर्यंत 541 पोलिसांनी केली कोरोनावर मात, अजून ही 1671 पोलिस कोरोनाच्या विळख्यात


आतापर्यंत 541 पोलिसांनी केली कोरोनावर मात, अजून ही 1671 पोलिस कोरोनाच्या विळख्यात
SHARES
लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कोरोनाविरुद्ध् लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला असुन, राज्यात आता एकूण  1671 पोलिस कोरोनाबाधीत आहेत. एकट्या मुंबईत 618 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे कळते. यामध्ये पोलीस कर्मचा-यांचा  मोठ्या प्रमाणांत समावेश आहे. याशिवाय 174 पोलिस अधिका-यांचा समावेश आहे. य तर आतापर्यंत 18 पोलिस कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

मुंबई पोलिसांनी नुकतीच पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. सध्या मुंबईत 600 हून अधिक कोरोनाग्रस्त पोलिस उपचार घेत आहेत. शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सहार पोलिस ठाण्यातील 24 पोलिसांचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. त्यापूर्वी जुहू, वाकोला, वडाळा, जे.जे. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत रुग्ण सापडलेल्या पोलिस वसाहतीतील काही इमारतीही सील करण्यात आल्या होत्या.

माञ पोलिसांमध्ये कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येत असल्याने पोलिसांमध्ये हा संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावत आहे.


राज्यभरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 246 प्रकरण घडली असून त्यात 827 नागरीकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्यात 84 पोलिस आणि 1 होमगार्ड जखमी झाला आहे. पुढे येणारे ईद आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाश्वभूमिवर राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आताच पोलिसांना विश्रांती मिळावी म्हणून राज्याने केंद्राकडे मदत मागितली होती. त्यानुसार मंगळवारी राज्यातील कोरोना हाँटस्पाँट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई, औरंगाबाद, मालेगाव आणि पुणे येथे CISF आणि CRPF च्या 5 तुकड्या दाखल झाल्या आहेत. या प्रत्येक तुकडीत 100 जवान असणार असून त्या जिल्ह्यात त्या जवानांच्या नेमणूकीचे अधिकार हे जिल्ह्यांच्या पोलिस आयुक्तांना दिलेले आहेत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा