राज्यात कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात ४७७ गुन्हे दाखल

राज्यात आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

राज्यात कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात ४७७ गुन्हे दाखल
SHARES

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही व्यक्ती परिस्थितीचा गैरफायदा घेत, सोशल मिडियावर अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४७७  गुन्हे दाखल झाले असून २५८ व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.  राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४७७ गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ N.C आहेत) नोंद १३ जून २०२० पर्यंत झाली आहे.

राज्यात आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १९५  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २४ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी  ९ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ५० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत  २५८ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

ऑनलाईन खरेदी करताना घ्या काळजी

सध्याच्या काळात बरेच नागरिक सर्व व्यवहार व अगदी किराणा सामानसुद्धा ऑनलाईन खरेदी करत आहेत व त्यांचे बिल पण आपल्या क्रेडिट /डेबिट कार्डस किंवा नेटबँकिंगद्वारे  पेड करत आहेत .सायबर भामटे सध्या सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवुणूक करण्यासाठी नवीन युक्त्या शोधत असतात. त्यासाठी त्यांनी एक नवीन प्रोग्रॅम कोड बनविला आहे . हा प्रोग्रॅम कोड या सर्व अशा वेबसाईटमध्ये  लपून बसतो व सर्व सामान्य नागरिक जेव्हा ऑनलाईन पैसे भरण्यासाठी आपले डिटेल्स जसे कि इंटरनेट बँक अकॉउंटचा id व पासवर्ड , डेबिट /क्रेडिट कार्ड्स चे पिन क्रमांक ,CVV क्रमांक ,मोबाईल नंबर इत्यादी भरतात तेव्हा हा प्रोग्रॅम कोड हे सर्व copy करतो व सायबर भामटे त्याची नोंद करतात .तुमची ही सर्व माहिती जमा करून सायबर भामटे एकतर डार्कनेटवर किंवा इंटरनेटवरील अन्य काळ्याबाजारात विकतात किंवा एखादा मोठा आर्थिक गुन्हा करून तुम्हाला लुबाडायचा त्यांचा डाव असतो .

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि तुम्ही ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना सावध राहा . शक्यतो ऑनलाईन payment करणे टाळा व 'Cash On Delivery 'चा पर्याय निवडा .तुम्ही एखादे ऑनलाईन transaction केल्यावर लगेच आपल्या बँकेच्या खात्यातील रक्क्म तपासून बघा ज्यामध्ये फक्त खर्च झालेली  रक्कम वजा झाली असली पाहिजे . तुम्ही ऑनलाईन आर्थिक व्यवहार ज्या वेबसाईटवर करत असाल तर सदर वेबसाईट सुरक्षित आहे याची खात्री करून घ्या . तुम्ही जर एखाद्या ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा व www.cybercrime.gov.in  या संकेतस्थळांवर देखील नोंद करण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचाः- रश्मी ठाकरे यांना पितृशोक

हेही वाचाः- सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा