घाटकोपरमध्ये क्वारंटाईन सेंटरला विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल


घाटकोपरमध्ये क्वारंटाईन सेंटरला विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
SHARES
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत  असताना, संपूर्ण प्रशासन या महामारीशी लढा देत आहे. या विषाणूने बाधित रुग्णांसाठी योग्य त्या सुविधासाठी सरकार युद्धपातळीवर क्वारन्टाइन सेंटर आणि रुग्णालय उभी केली जात असताना, घाटकोपरमध्ये काही सोसायटीतील नागरिकांनी त्यांच्या परिसरात क्वारन्टाइन सेंटरला विरोध केला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने या सोसायटीवाल्यांची समजूत काढून सुद्धा ते विरोध करत असल्याने पोलिसांना अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला आहे.
 मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांसाठी घाटकोपर येथे एका मुलांच्या वसहतीगृहात पालिके तर्फे अलगीकरण कक्ष उभारले जात असताना. घाटकोपरमध्ये त्या क्वारन्टाइन सेंटरला नागरिकांनी रस्त्यावर येऊन विरोध दर्शवला. यातील काही जण या रुग्णांमुळे तुम्हालाही ञास होईल, अशा प्रकारे चुकीच्या अफवा पसरवत होते. प्रकरण हाताबाहेर जात असल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी अखेर पोलिसांना पाचरण केले. रस्त्यावर उतरलेल्या 40 ते 45 जणांनी पोलिसांच्या विनंतीला ही दाद न देता विरोध कायम ठेवला. त्यावेळी विरोध करणाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंगचे ही उल्लघंन केले. या ठिकाणी पालिकेकडून 150 रुग्णांसाठी क्वारन्टाइन सेंटर उभारले जात होते.
या घटनेची गंभीर दखल घेत अखेर घाटकोपरच्या वार्ड अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 40 ते 45 विरोध करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सीसीटव्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांची ओळख पटवत असल्याची माहिती सूञांनी दिली आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा