अरे वा! पोलिसांच्या मुलांना मिळणार आता 'ई-लर्निंग' सुविधा

पोलिस अधिकारी व कर्माचा-यांच्या मुलांना अॅप्लिकेशनच्या सहाय्याने ई-लर्निंग सुविधा पुरवण्यात येणार आहे. राज्य पोलिस दलाच्या या उपक्रमा अंतर्गत आयसीएसई, सीबीएससी व एसएससी बोर्डात शिकणा-या पहिली ते बारावी पर्यंत ही सुविधा पुरवण्यात येणार आहे.

अरे वा! पोलिसांच्या मुलांना मिळणार आता 'ई-लर्निंग' सुविधा
SHARES
जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांना वेळेआभावी त्यांच्या मुलांकडे लक्ष देता येत नाही.  बऱ्याच पोलिसांना आपली मुले शिकून मोठी व्हावी, असे वाटत असले तरी, त्यांना मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठविणे परवडत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 24 तास ड्युटी लागल्याने पोलिसांना त्यांच्या मुलांचा अभ्यास घेता येत नाही. त्यामुळे राज्यातील पोलिसांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने राज्यसरकारने प्रथमचं स्वयंशिक्षा ई-लर्निंग अभियान सुरू करण्यात आले आहे. या  अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणीत प्रगतीसाठी शाळा सुरू होईपर्यंत सर्व पोलिस अधिकारी व कर्माचा-यांच्या मुलांना अॅप्लिकेशनच्या सहाय्याने ई-लर्निंग सुविधा पुरवण्यात येणार आहे. राज्य पोलिस दलाच्या या उपक्रमा अंतर्गत आयसीएसई, सीबीएससी व एसएससी बोर्डात शिकणा-या पहिली ते बारावी पर्यंत ही सुविधा पुरवण्यात येणार आहे.


कोरोनामुळे राज्यातील सर्व पोलिस सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सध्या शाळाही बंद असल्यामुळे पोलिसांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य पोलिस दलाने स्वयंशिक्षा ई-लर्निंग हा स्वागतार्ह उपक्रम सुरू केला आहे. भारतातील ई-लर्निंगमध्ये महत्त्वाचे नाव असलेल्या बायजू या कंपनीची मदत घेतली जात आहे. या कंपनीच्या मदतीने द लर्निंग अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली असून शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या पाल्यासाठी कोर्स मटेरियल, व्हिडिओ लेक्चर व अॅनिममेशन ड्रीव्हन स्टडिज पुरवण्यात येणार आहे. पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणा-या सर्व पोलिसांच्या पाल्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आयसीएसई, सीबीएससी व एसएससी बोर्डात शिकणारे विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

राज्यभरातील पोलिसांच्या मुलांसाठी असलेल्या या सुविधेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही नोंदणीही ऑनलाईन ठेवण्यात आल्यामुळे घरबसल्या पोलिस आपल्या पाल्याची नोंदणी करू शकतात. या नोंदणीत पाल्याची सर्व माहिती भरल्यानंतर दोन दिवसात पाठवण्यात येणा-या विशिष्ठ लिंकच्या मदतीने पोलिसांचे पाल्य त्यांचा अभ्यास सुरू करू शकतील. त्याचा फायदा राज्य पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारा-यांची मुले घेऊ शकतात. त्यात घर बसल्या विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाला सुरूवात करू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासा रुची निर्माण व्हावी यासाठी बायजू या अग्रगण्या कंपनीच्या मदतीने  अॅनिमेशेन व अद्यायावत तंत्राची मदत घेऊन हे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
संबंधित विषय