धक्कादायक..! मुंबईच्या जी टी रुग्णालयातून कोरोनाचा रुग्ण पळाला


धक्कादायक..!  मुंबईच्या जी टी रुग्णालयातून कोरोनाचा रुग्ण पळाला
SHARES
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असताना, दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णांकडून बेशिस्तपणाचे वर्तन समोर आले आहे. कोरोनाचा एक रुग्णच जीटी हाँस्पिटलमधून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी त्या रुग्णावर आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशांणदार यांनी दिली आहे.


 मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 635 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 26 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना या महामारीने आतापर्यंत 387 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण 9758 रुग्ण आहेत. कोरोनला रोखण्यासाठी आणि रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, पालिका कर्मचारी, डाँक्टर आपाला जीव धोक्यात घालवून या रुग्णांना वाचवण्यासाठी धडपडत आहेत. माञ दुसरीकडे रुग्णांच्या वागणूकीवरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोनाचे रुग्ण स्वत: काळजी घेत नाहीत.  ज्या व्यक्तींना क्वारन्टाइन केले आहे. ते बिन दिक्कत समाजात वावरताना या पूर्वी ही समोर आले आहे. यासारख्या घटना समोर येत असतानाच, मंगळवारी राञी जीटी रुग्णालयातून एक रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षण आढळून आले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल केले होते. माञ उपचारा दरम्यान डाँक्टर आणि वाँर्डबाँय यांची नजर चुकवून या रुग्णाने मंगळवारी राञी रुग्णालयातून पळ काढला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. आझाद मैदान पोलिस ठाण्यात या प्रकरणी साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानातर्गत त्या पळून गेलेल्या रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे. या रुग्णांमुळे कोरोना या संसर्ग जन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांची टीम आरोपीच्या शोधासाठी कामाला लागली असून शोध सुरू असल्याची माहिती सूञांनी दिली आहे.

  
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा