Corona virus: सायबर गुन्हेगार आता अशी करत आहेत फसवणूक


Corona virus:  सायबर गुन्हेगार आता अशी करत आहेत फसवणूक
SHARES
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव वाऱ्याच्या वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. देशात संचारबंदी असल्याने बहुतांश नागरिक घरी राहून मोबाइलवर आपला वेळ घालवत आहे. याच गोष्ठीचा फायदा आता सायबर चोरट्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत कोरोनाच्या संदर्भात आतापर्यंत 50 ते 60 जणांची फसवणूक झाल्याचे पुढे  आहे. संचारबंदी असल्याने तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी आहे, माञ अशा इंटरनेटवरील अशा फसव्या लिंक, मेसेज, फोन, अँप, हेल्पलाइननंबर पासून सावध राहण्याचे  आवाहन पोलिसांनी केले आहे.

जगातील लोकांना कोरोनाची दहशत दाखवून त्यांची फसवणूक करण्याचा धंदा सायबर गुन्हेगारांनी सुरु केला आहे. ते कधी जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी म्हणून फसवणूक करतायेत तर कोविड १९ च्या नावावर बनावट वेबसाईट्स बनवून त्यावर हेल्पलाइनवर स्वत:चा नंबर देऊन, नागरिकांची माहिती मिळवत फसवणूक करत आहेत. झारखंडमधून हा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात चालतो.

 ब्रिटिश सिक्युरिटी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपनीच्या रिपोर्टनुसार सायबर गुन्हेगारांनी फसवणूकीचे  चार मार्ग अवलंबले आहेत. ते पुढील प्रमाणे:-

 1) लिंक पाठवून फसवणूक 

कोरोनाच्या भितीने देशास संचार बंदी असल्यामुळे घराबाहेर न पडणाऱ्या व्यक्तींमध्ये मोबाइलचा वापर वाढला आहे. त्यामुळे लेटेस्ट मूव्ही, लेटेस्ट कोरोना बातमी, आँनलाईन गेमच्या नावाखाली नागरिकांच्या मोबाइलवर लिंक पाठवली जाते. नागरिकांचा मोबाइल त्याच्या गुगल किंवा इतर बँक खात्याशी कनेक्ट असल्यास लिंक ओपन करताच,  त्या व्यक्तीच्या बँक खात्याबाबतची सर्व माहिती आरोपीला मिळते . काही समजायच्या आतच, त्या व्यक्तीचे  खाते साफ केले जाते. 

2)  फेक वेबसाईट करू शकते घात

घरबसल्या कोरोनाबाबत अधिक माहितीसाठी किंवा हेल्पलाईन शोधण्यासाठी अनेकजण गुगलचा वापर करतात. हे लक्षात घेऊनच आरोपींनी सरकार किंवा खासगी कंपन्यांच्या वेबसाईटसारखी हुबहुब वेबसाईट बनवतात. त्या वेबसाईटवर गरजू व्यक्ती काही आँर्डर करायला गेला. तर त्याच्या बँकेतील खात्याची माहिती घेऊन त्याच्या खात्यातून पैसे चोरी करतात. आँनलाईन शाँपिंगप्रमाणेच ही फसवणूक केली जाते. काही दिवसांपूर्वी अशी फसवणूक करणाऱ्या टोळीचा वांद्रे पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यामुळे आँनलाईन कुठलिही गोष्ठ मागवताना, सुरूवातीला तुम्ही शोधत असलेले पेज अधिकृत आहे का?  ते तपासून मगच व्यवहार करा.

3) धमकीचा मेल पाठवून 

नागरिकांना अचानक त्याच्या मेलवर एक मेल येतो. या धमकीच्या ईमेलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जर यूजर्सने त्यांना पैसे दिले नाहीत तर यूजर्सच्या घराच्या कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसचा पसरवू शकतो. आतापर्यंत जगात सेक्सटॉर्शन ईमेल केले जात होते. यामध्ये युजर्सला सांगितलं जातं होतं की, तुमचे अश्लिल फोटो आमच्याकडे आहेत जर पैसे दिले नाहीतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकी दिली जात असे. पण आता सायबर गुन्हेगारांनी अजब शक्कल शोधून काढली आहे. त्यासाठी त्यांनी लोकांच्या मनात असणाऱ्या कोरोनाच्या दहशतीचा वापर केला आहे. सायबर गुन्हेगारांनी ईमेल पाठवून  पैसे मागितले जातात. पैसे नाही दिले तर युजर्सच्या काही रहस्य उघड करु तसेच घरातील एका व्यक्तीला कोरोनाग्रस्त करु अशी धमकी देत आहेत. ईमेलमध्ये युजर्सला त्याचा जुना पासवर्डही सांगितला जात आहे. तसेच युजर्सच्या प्रत्येक सोशल साईट्सचा पासवर्ड माहिती असून अनेक दिवसांपासून त्यावर वॉच ठेवला जात आहे असा दावा गुन्हेगार करत आहेत.

तुमच्याकडे असा ईमेल आला तर काय कराल?

जर तुमच्याकडे अशाप्रकारे धमकीचा ईमेल आला तर घाबरण्याची गरज नाही. मागील काही दिवसात झालेल्या डेटा लीकमधून तुमचा जुना पासवर्डही लीक झाल्याची शक्यता आहे. Sophos च्या प्रिंसिपल रिसर्चचे पॉल डकलिन यांनी सांगितले की, काहीही पैसे पाठवू नका, हे सर्व खोटं आहे. त्यांच्याकडे कोणताही डेटा नसतो. जर तुम्ही पैसे देत असाल तर ते तुम्हाला आणखी घाबरवू शकतात

4)आरोग्य अधिराकारी म्हणून फोन करून 

मुंबईत फोन करून विमा पाँलिसी, बँकेतून बोलतोय, लोन संदर्भात फोनकरून अशी आतापर्यंत अनेकांची फसवणूक केली आहे. माञ आता आरोपी  कोरोनाव्हायरस बाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा फायदा घेऊन कधी ते डब्ल्यूएचओ अधिकारी (WHO) असल्याचे सांगून लोकांची फसवणूक केली जात आहे, तर कधी कोविड -19 (Covid - 19) च्या नावावर बनावट वेबसाइट्स तयार करून लोकांना फसवलं जात आहे.तर फसवणूक करणारे अँपचा ही अनेक ठिकाणी फसवणूकीसाठी वापर करण्यात आला आहे.


महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे अशा प्रकारच्या 50 ते  60 तक्रारी आल्या असून नागरिकांना लाखो रुपयांना गंडवण्यात आले आहे. संचारबंदीमुळे नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे आलेले नाहीत माञ अशा सायबर गुन्हेगारापासून सावध रहा, मोबाइलवर आलेली कुठलिही लिंक, मेसेज अथवा फोन किंवा मेल खाञीशिवाय उघडू नका, त्याला वैयक्तित किंवा बँकेसंदर्भातील माहिती व उत्तर देऊ नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

संबंधित विषय