• 'बीएसफ, सीआरपीएफमध्ये भ्रष्टाचार'
SHARE

दादर - सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा गौप्यस्फोट ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला. गृह खात्याच्या अखत्यारीत असलेल्या बीएसएफ आणि सीआरपीएफमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच देशाचं संरक्षण करणाऱ्या सीमेवरील बीएसएफ आणि सीआरपीएफमधील जवानांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिले जात असल्याचंही त्यांनी मान्य केलं. ‘मुंबई लाइव्ह’च्या उंगली उठाओ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.

आम्ही लष्करात असताना चांगल्या दर्जाचं जेवण जवानांना दिलं जात होतं, असं म्हणत त्यावेळी जेवण आमच्या डोळ्यांदेखत तपासलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या