पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या?


पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या?
SHARES

चेंबूर - विवाह होऊन सहा महिने झालेल्या जोडप्यामधील पत्नीचा हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी चेंबूरच्या भाई-भाईनगरमध्ये घडली आहे.

गुलाम शेख (50) आणि नसीमा बानो शेख (40) असं मृत पती-पत्नीचं नाव असून दोघांचाही हा दुसरा विवाह होता. रविवारी बंद घरामध्ये दोघेही रक्ताच्या थारोळयात पडले होते. शेजाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दोघांना सायन रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाला. तर रात्री उपचारादरम्यान गुलाम शेख यांचा मृत्यू झाला. प्रथमिक तपासात गुलाम शेख यांनी पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

संबंधित विषय