गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकाला अटक

कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा हस्तक विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्स (२१ वर्षे) याच्या मुसक्या आवळण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. गोरेगावमधील एका बांधकाम व्यावसायिकाला पुजारीकडून २ कोटींच्या खंडणीसाठी धमकावलं जात होतं. याप्रकरणी या बांधकाम व्यावसायिकांनं पोलिस तक्रार दाखल केली होती.

गँगस्टर रवी पुजारीच्या हस्तकाला अटक
SHARES

कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा हस्तक विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्स (२१ वर्षे) याच्या मुसक्या आवळण्यात अखेर गुन्हे शाखेला यश आले आहे. गोरेगावमधील एका बांधकाम व्यावसायिकाला पुजारीकडून २ कोटींच्या खंडणीसाठी धमकावलं जात होतं. याप्रकरणी या बांधकाम व्यावसायिकांनं पोलिस तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करत असताना खंडणीविरोधी पथकाला विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्स या पुजारीच्या हस्तकाची माहिती मिळाली. त्यानंतर खंडणीविरोधी पथकानं त्याला अटक केली. दरम्यान विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्सला १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

गोरेगावमधील बांधकाम व्यावसायिकाला डिसेंबर २०१८ पासून खंडणीसाठी फोन येत होते. तर त्याला पुजारीकडून धमक्या दिल्या जात होत्या. या धमक्यांना न भीक न घालणार्या या बांधकाम व्यावसायिकाला शेवटी पुजारीकडून कुटुंबियांच्या नावे धमक्या दिल्या जाऊ लागल्या. धमक्यांच्या फोनच सत्र वाढल्यानं आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ लागल्यानं शेवटी या बांधकाम व्यावसायिकांनं पोलिसांकडे धाव घेत यासंबंधी तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास करताना या प्रकरणातील माहिती पुजारीपर्यंत पोहचवली जात असल्याचा संशय खंडणीविरोधी पथकाला आला. त्यानुसार या दिशेने तपास केला असता विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्सपर्यंत पोहचण्यात खंडणीविरोधी पथकाला यश आलं.


पुजारीपर्यंत पोहचवायचा माहिती

ओशिवरा बस आगारासमोर राहणारा विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्स हाच या प्रकरणाची सर्व माहिती पुजारी टोळीपर्यंत पोहचवत असल्याचं उघड झालं. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरिक्षक सचिन कदम, सहपोलिस निरिक्षक राजु सुर्वे, हवालदार अरूण जाधव यांच्या पथकानं बुधवारी विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्सला अटक केली आहे. तर पुजारी आणि त्याचा हस्तक विल्यम अल्बर्ट राॅड्रिक्सविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या हस्तकाविरोधात याआधीच गोरेगाव पोलिसा ठाण्यात हाणामारीचे गुन्हे दाखल असून त्याच्याविरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुजारीच्या हस्तकाला अटक करणं ही पोलिसांसाठी मोठं यश मानलं जात आहे.



हेही वाचा -

धारावी पुनर्विकास- कोण मारणार बाजी? अदानी कि सेक्लिंक?

अंधेरीत कंत्राटदारावर गोळीबार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा