वाईन शॉप लुटणारे दोघे अटकेत


वाईन शॉप लुटणारे दोघे अटकेत
SHARES

काळाचौकीतील वाईन्सचे दुकान लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. रेहमान शेख उर्फ चिकना बंगाली, रेहमान जान शेख उर्फ लाला अशी या दोघांची नावं आहेत. हे वाईन शाॅप लुटण्यासाठी दोघंही एक महिन्यापासून वाईन्स शाॅप बाहेर भिकाऱ्यांचे वेशातंर करून रेखी करत होते.

काळाचौकीच्या वीर तानाजी मालुसरे रोड परिसरातील फेरबंदर इथं संपत भारती यांचे वाईन शॉपचे दुकान होते. वाईन शॉपमधून दिवसाला मोठ्या प्रमाणात दारूची विक्री व्हायची. दिवसाला जमा झालेले पैसे हे दुसऱ्या दिवशी बँकेत जमा केले जायचे. तर आठवड्याच्या विक्रीचा हिशोब बुधवारी व्हायचा. दुकानात चार कामगार हे कामाला होते. १५ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे दुकान मालकांनी जमा झालेली कॅश मोजून ती तिजोरीत न ठेवता फ्रिजमधील एका कोपऱ्यात लपवली होती. दरम्यान या दोन्ही आरोपींनी मागच्या दाराचे कुलूप तोडून शॉपमधील दिवसाचे जमा झालेले १० हजार आणि किरकोळ खर्चासाठी लागणारे सुट्टे पैसे ७० हजार चोरले.

चेहऱ्याला रुमाल बांधून या दोघांनी ही चोरी केल्यामुळे सीसीटिव्हीत ही त्यांची ओळख पटत नव्हती. दरम्यान काही दिवसांपासून चिकना बंगाली हा परिसरात मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असून त्यानं मोठी चोरी केली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन खाकीचा धाक दाखवलयानंतर त्यानं गुन्ह्यांची कबूली दिली. या दोघांचा ताबा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काळाचौकी पोलिसांना दिला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.


हेही वाचा

आणखी दोन संशयित दहशतवादी एसटीएसच्या जाळ्यात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा