'या' कारणामुळं 53 हजार वाहन चालकांची वाहनं जप्त


'या' कारणामुळं 53 हजार वाहन चालकांची वाहनं जप्त
SHARES

करोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू असतानाही काही नागरिकांना शहरातून फेरफटका मारण्याचा मोह आवरत नसून या नागरिकांना वारंवार समज देऊनही त्यांचा स्वच्छंद विहार सुरूच आहे. यामुळेच अशा विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या 53  हजार 71 वाहनचालकांची वाहने आतापर्यंत राज्यभरात पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामुळे अनावश्यक घराबाहेर पडणे टाळा.

मुंबईत आता कानाकोपऱ्यातून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या संसर्ग जन्य रोगाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर येण टाळा असे आवाहन सरकार आणि पोलिसांकडून वारंवार केलं जात आहे. माञ तरी त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक नेहमी प्रमाणे घराबाहेर या ना त्या निमित्ताने येत आहे. नागरिकांना कारवाईची भिती वाटावी म्हणून पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली. माञ तरी ही त्याचा फारसा फरक काही पडला नाही. नागरिकांच्या या असहकार्य भूमिकेला कंटाळून अखेर गृहमंञ्यांनी अनावश्यक रस्त्यांवर गाड्या घेऊन फिरणाऱ्यांच्या गाज्यात जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात या कारवाईला सुरूवात करण्यात आली होती.  मुंबईत पोलिसांकडून आतापर्यंत 709 वाहन जप्त करण्यात आली आहे.

 माञ नागरिकांच्या वागणुकीला कंटाळूनच गृहमंञ्यांनी वाहन जप्तीचे आदेश पोलिसांना दिले आहेत.  जप्त केलेली वाहने पुढील 3 महिने सोडली जाणार नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले असून कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी शहरातून विनाकारण भटकणे टाळावे, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा घराजवळ केला जात आहे, गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठीदेखील विविध उपाययोजना केल्या जात असून नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, मात्र करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा