परदेशी नोकरीच्या नावाखाली फसवणाऱ्यास अटक


परदेशी नोकरीच्या नावाखाली फसवणाऱ्यास अटक
SHARES

मुंबईतील तरुणांच्या बेरोजगारीचा फायदा घेऊन त्यांना परदेशात नोकरी मिळवून देण्याचे अाश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या एकाला कफ परेड पोलिसांनी अटक केली अाहे. चंदन नारायण देबनाथ उर्फ बाबू घोष (३५) असं या अारोपीचं नाव अाहे.


पाच जणांकडून घेतले २५ हजार रुपये

पश्चिम बंगालमधील कबली ब्रिजजवळील हुगली परिसरात राहणारा चंदन सध्या अापल्या पत्नीसह वांद्रे इथं वास्तव्यास अाहे. तक्रारदार मोहम्मद मयुद्दीन बिस्वास अाणि त्याचा मेव्हणा मंटू मंडल या बेरोजगार तरुणांची एका मित्राच्या परिचयातून चंदनशी अोळख झाली होती. चंदनकडे कामाची विचारणा केल्यानंतर त्याने या दोघांना वांद्रे स्थानकाजवळ भेटण्यासाठी बोलावले होते. चंदनने अापल्या अोळखीनुसार दुबई येथे ५० हजार रुपये महिना अशी नोकरी देण्याचे अामीष या दोघांना दाखवले. तसंच अन्य तरुणांचीही गरज असल्याचे त्याने सांगितल्यानंतर या दोघांना अन्य तीन मित्रांना नोकरीबाबत सांगितले. पासपोर्ट अाणि अन्य कागदपत्रे बनवण्यासाठी चंदनने प्रत्येकाकडून २५ हजार रुपये घेतले होते.


... अाणि चंदन फरार झाला

पैसे देणाऱ्यांना विश्वास पटावा, यासाठी तक्रादार अाणि अन्य दोघांना त्याने कफ परेड येथील दुबई राजदूताच्या अाॅफिसचीही वारी त्याने घडवून अाणली. पासपोर्ट अाणि व्हिसा जमा करून घेण्याच्या नावाखाली चंदन गेला तो पुन्हा परतलाच नाही. तक्रारदार अाणि त्याच्या मेव्हण्याने चंदनशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण चंदनचा फोन बंद येत होता. चौकशीदरम्यान त्याचे नाव चंदन नसून बाबू घोष असल्याचे कळाले.


पोलिसांच्या जाळ्यात चंदन सहजपणे अडकला

आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तक्रारदारांनी कफ परेड पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चंदनला पडण्यासाठी सापळा रचला. नोकरी हवी असल्याचं सांगत त्यांनी चंदनशी संपर्क साधून त्याला भेटायला बोलावलं आणि चंदन सहजपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. चंदनकडे अनेक पासपोर्ट सापडल्यामुळे त्याने अशाचप्रकारे अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता कफ परेड पोलिसांनी वर्तवली अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा