मुंबई विमानतळावरून ५० किलो सोनं हस्तगत


SHARE

मुंबई विमानतळावरून चार विविध कारवायांमध्ये कस्टम अधिकाऱ्यांनी प्रवाशांनी अवैध मागानं अाणलेलं तब्बल ५० किलोहून अधिक सोनं हस्तगत केलं अाहे. ताब्यात घेतलेल्या या सोन्याची किंमत काही कोटी रुपये असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली अाहे.


मोठ्या प्रमाणात होते सोन्याची तस्करी

अन्य देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी केली जाते. मुंबई अांतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणावर सोनं सापडत असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली अाहे. दुबईहून अालेल्या प्रवाशांकडून सीमा शुल्क न भरता मोठ्या प्रमाणावर सोनं अाढळून येत अाहे. सीमा शुल्क न भरता परदेशातून सोनं अाणायचं अाणि सराफा बाजारात त्याची विक्री करायची, या एकमेव हेतूनं ही तस्करी केली जात अाहे.


कुरिअर पॅकेटमधून सोनं हस्तगत

शुक्रवारी केलेल्या कारवाईत चार विविध घटनांमध्ये कोट्यवधी रुपयांचं सोनं हस्तगत केलं अाहे. गल्फ देशातून एक कुरिअरचं पॅकेट अालं होतं. त्यात कस्टम विभागाला ५० किलोचं सोनं अाढळून अालं अाहे. दुसऱ्या एका घटनेत नाॅयलाॅनच्या रोपमधील चोर कप्प्यातून अाणि मोबाईलमधून सोन्याचे २६ बार जप्त करण्यात अाले अाहेत. तिसऱ्या कारवाईत एका महिलेकडून छुप्या पद्धतीनं अाणलेलं ४१० ग्रॅम सोनं जप्त केलं अाहे. त्याची किंमत १० लाख इतकी अाहे. चौथ्या घटनेत १३९३ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या अाहेत. त्याची किंमत ३५ लाख रुपये इतकी असल्याचं कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितलं.


संबंधित विषय
ताज्या बातम्या