मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करीप्रकरणी महिलेला अटक, ४८१ ग्रॅम सोनं जप्त


मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करीप्रकरणी महिलेला अटक, ४८१ ग्रॅम सोनं जप्त
SHARES

मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी तिच्या सामानातून तब्बल ४८१ ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. एका चाँकलेटच्या कव्हरमध्येलपवून या महिलेने दुबईहून हे सोनं आणलं असल्याचे तपासात पुढे आलं आहे.

 चाँकलेटच्या खोक्यातून ही महिला सोन्याची तस्करी करीत होती. विमानतळावरील तिच्या संशयास्पद हालचालीवरून कस्टम अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला. कस्टम अधिकार्यांनी तिला चौकशीला ताब्यात घेतलं असता. त्या महिलेच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा लागल्या होत्या, कस्टम अधिकाऱ्यांना सुरवातीला काही संशयास्पद आढळून आले नाही. मात्र दुबईहून आणलेल्या चाँकलेटचे कव्हर पाहताच पोलिसांना संशय आला. चाँकलेटच्या आवरणाला महिलेने सोन्याचं कोटिंग केलं होतं. तसेच हे सोन स्कॅनिंग मशीनमध्ये दिसू नये म्हणून त्याला कार्बन पेपरचं आवरण देखील लावण्यात आलं होतं. तपासानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी ४८१ ग्रॅम सोनं जप्त करत महिलेला अटक केलेली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा