ड्रीम इलेव्हनच्या सीईओची १० लाखांना फसवणूक

'ड्रिम इलेव्हन' या कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी नवीन अग्रवाल यांना कंपनीचे सीईओ हर्ष जैन यांच्या ईमेल आयडीशी साधर्म असलेल्या ईमेल आयडीवरून एक मेल आला. या ई-मेलमध्ये हर्ष यांनी लवकरात लवकर १० लाख रुपये पाठवण्यात येतील का? याबाबत विचारणा केली होती.

ड्रीम इलेव्हनच्या सीईओची १० लाखांना फसवणूक
SHARES

मुंबईसह इतर शहरात सध्या आयपीएलची धामधुम सुरू असताना याच खेळाशी संबंत असलेला मोबाइल गेम 'ड्रिम इलेव्हन' या कंपनीच्या मुख्य संचालकांना सायबर चोरट्यांनी लक्ष केले आहे. संचालकांच्या नावाने बनावट ई-मेल पाठवून १० लाख रुपये लाटण्याचा प्रयत्न सायबर चोरटे करत होते. मात्र वेळीच ही बाब संचालकांच्या लक्षात आल्यानंतर वेळीच ही रक्कम रोखण्यात कंपनीला यश आले आहे. या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 


मेलवरून पैशाची मागणी

 'ड्रिम इलेव्हन' या कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी नवीन अग्रवाल यांना कंपनीचे सीईओ हर्ष जैन यांच्या ईमेल आयडीशी साधर्म असलेल्या ईमेल आयडीवरून एक मेल आला. या ई-मेलमध्ये हर्ष यांनी लवकरात लवकर १० लाख रुपये पाठवण्यात येतील का? याबाबत विचारणा केली होती. त्या ई-मेलला प्रतिउत्तर देत अग्रवाल यांनी बॅँक खात्याची माहिती हर्ष यांच्याजवळ मागितली.  त्यानंतर संबंधीत ई-मेल आयडीवरून उत्तर प्रदेशातील फरीदाबाद येथील बॅँक खात्याची माहिती अग्रवाल यांना पाठवण्यात आली. त्यानुसार अग्रवाल यांनी वित्त विभागात काम करणा-या महिला कर्मचा-याला ही रक्कम संबंधीत खात्यावर ताबडतोब हस्तांतरीत करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ही रक्कम पाठवत अग्रवाल यांना तसे कळवले.


व्यवहार थांबवला

मात्र या सर्व व्यवहारावर अग्रवाल यांच्या मनात संशय होता. त्यामुळे त्यांनी तात्काळ हा व्यवहार थांबवण्याबाबत बँकेला कळवले. त्यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ हर्ष जैन यांच्याशी संपर्क साधून या व्यवहाराबाबत विचारणा केली. त्यावेळी हर्ष यांनी अशा प्रकारे कुठलेही पैसे मागितले नसल्याचे सांगितले. या प्रकरणी कंपनीचे उपाध्यक्ष अमोल आपटे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी दादर पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४१९ सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६६ (क) व (ड) अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला असून दादर पोलिस अधिक तपास करत आहे. 



हेही वाचा -

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा