माटुंग्यातील व्यावसायिकाला कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारे अटकेत

माटुंगा येथील व्यावसायिक विमल हुरजी शहा यांच्या खात्यातून तब्बल १ कोटी ८६ लाख रुपये चोरणारे चोरटे अखेर पोलिसांच्या हाती लागले आहेत. शहा यांचा मोबाईल क्रमांक बंद करून त्यांच्याय खात्यातून रक्कम चोरणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर पोलिसांनी नुकतीच कोलकत्ता इथून अटक केली आहे.

माटुंग्यातील व्यावसायिकाला कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारे अटकेत
SHARES

माटुंगा येथील व्यावसायिक विमल हुरजी शहा यांच्या खात्यातून तब्बल १ कोटी ८६ लाख रुपये चोरणारे चोरटे अखेर पोलिसांच्या हाती लागले आहेत. शहा यांचा मोबाईल क्रमांक बंद करून त्यांच्याय खात्यातून रक्कम चोरणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर पोलिसांनी नुकतीच कोलकत्ता इथून अटक केली आहे. सागर दास (३४ वर्षे) आणि चुनचुन पाठक (४९ वर्षे) असं या अटक करण्यात आलेल्या सायबर चोरट्यांची नाव आहेत.


असा घातला गंडा

शहा हे मांटुग्यातील कपडा व्यापारी आहेत. २७ डिसेंबरला ते त्यांच्या कार्यालयात असताना रात्री नऊच्या सुमारास त्यांना एका मागोमाग एक असे वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून सहा मिसकाॅल आले. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांना एक मॅसेज आला. हा मॅसेज वाचताच त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. कारण कारण हा मॅसेज होता तो त्यांच्या खात्यातील १ कोटी ८६ लाख रुपये काढण्यात आल्याचा. इतक्या मोठ्या रक्कमेचा गंडा बसल्यानंतर शहा यांनी त्वरीत वांद्रयाच्या साबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.


कोलकत्ता इथून अटक

या तक्रारीनुसार पोलिसांनी त्वरीत प्रकरणाचा तपास सुरू केला. या तपासणीत चोरीला गेलेले पैसे आरोपींनी वेगवेगळ्या २८ खात्यांवर वळवल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांनी या २८ ही खात्यांची माहिती जमा करण्यास सुरूवात केली. त्यानुसार पश्चिम बंगाल, दिल्ली आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांमधील ही २८ खाती असल्याच समोर आलं. दरम्यान आरोपींनी या २८ खात्यांमधील एका खात्यातून १४ लाख रुपये काढले आणि तिथंच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी त्वरीत कोलकत्ता इथं धाव घेत उर्वरित रक्कम काढण्यासाठी आरोपी आले असता त्यांना तिथंच रंगेहाथ अटक केली. आता याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.



हेही वाचा -

सायबर चोरट्यांनी घातला इटालियन कंपनीला १३० कोटींचा गंडा

आक्षेपार्ह विधानामुळं जिमखान्याचे हार्दिक पांड्याचे मानद सदस्यत्व रद्द



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा