दाऊदचा हस्तक रियाज भाटीला अटक

एका नामांकित कॉलेजच्या विश्वस्तांची खोटी स्वाक्षरी केली होती. सदस्यत्व मिळाल्यानंतर रियाजने खेळाडूंसोबत परदेशी दौरा ही केला.

दाऊदचा हस्तक रियाज भाटीला अटक
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक रियाज भाटी याला खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी नामांकित कॉलेजच्या विश्वस्तांची खोटी स्वाक्षरी करून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्यत्त्व घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. रियाज भाटी याच्याविरोधात यापूर्वी देखील जमीन बळकावणे, खोट्या पासपोर्टचे गुन्हे दाखल आहेत.


दाऊदच्या नावाने धमकी 

मुंबईत धमकी, जमिन बळकावणे, खोट्या पासपोर्टच्या गुन्ह्यात पोलिसांच्या रडारवर रियाज होता. काही दिवसांपूर्वीच त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)चे सदस्यत्व मिळवण्यासाठी त्याने  एका नामांकित कॉलेजच्या विश्वस्तांची खोटी स्वाक्षरी केली होती. सदस्यत्व मिळाल्यानंतर रियाजने खेळाडूंसोबत परदेशी दौरा ही केला. ही बाब संबधित काँलेज प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर  कॉलेज विश्वस्तांनी या प्रकरणी रियाज भाटीच्या विरोधात हरकत घेण्यासाठी पाऊले उचलली. याची माहिती मिळताच रियाजने  कॉलेज विश्वस्तांना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देण्यास सुरुवात केले. याप्रकरणी मुंबई खंडणी विरोधी पथकाने रियाज भाटी विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याला अटक केली.


जुना सहकारी

रियाज भाटी हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जुना सहकारी असून त्याच्याविरोधात जमीन बळकावणे, बनावट पासपोर्ट प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सहार पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली होती. तसेच ठाणे खंडणीविरोधी पथकाचे एसीपी प्रदीप शर्मा यांनी देखील त्याला एका गुन्ह्यात अटक केली होती.



हेही वाचा -

मुंबई पोलिसांनी वाचवले परदेशी नागरिकाचे प्राण



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा