मुंबई पोलिसांनी वाचवले परदेशी नागरिकाचे प्राण

वाढत्या कामाच्या त्रासामुळे आणि कौटुंबिक सुख मिळत नसल्यामुळे सॅम हे नैराक्षेत होते. त्यांनी अनेकदा कंपनीकडे मायदेशी पाठवण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. मात्र कंपनीने त्यांच्या प्रस्तावाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते.

मुंबई पोलिसांनी वाचवले परदेशी नागरिकाचे प्राण
SHARES

अतिरिक्त कामाचा ताण आणि कौटुंबिक सुख मिळत नसल्याने गुरूवारी एका ब्रिटिश नागरिकाने पवई परिसरात आत्महत्येची इच्छा पत्नीजवळ व्यक्त केली. क्षणाचाही विचार न करता त्याच्या पत्नीने ब्रिटिश दूतावासाच्या मदतीने मुंबई पोलिसांकडे मदत मागितल्यानंतर पोलिसांनी त्या ब्रिटिश नागरिकाला शोधून काढत त्याचे मनपरिवर्तन करून त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. मुंबई पोलिसांच्या या कार्याचे कौतुक सध्या सर्वत्र होत आहे.  


पत्नी आॅस्ट्रेलियात

मूळचे ब्रिटनचे रहिवाशी असलेले सॅम कोलार्ड (६१) हे अंधेरी येथील एका परदेशी कंपनीत मोठ्या हुद्यावर आहेत. तर त्यांची पत्नी ही आॅस्ट्रेलियात वास्तव्यास आहे. वाढत्या कामाच्या त्रासामुळे आणि कौटुंबिक सुख मिळत नसल्यामुळे सॅम हे नैराश्येत होते. त्यांनी अनेकदा कंपनीकडे मायदेशी पाठवण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. मात्र कंपनीने त्यांच्या प्रस्तावाकडे फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते. याच कारणांवरून कंटाळलेल्या सॅम यांनी ते सध्या रहात असलेल्या पवई हिरानंदानी काॅलनीतून आॅस्ट्रेलियातील पत्नीला २७ जून रोजी फोन करून आपण जीवनाला कंटाळलो असून आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले.


दीड तास मनपरिवर्तन 

घाबलेल्या पत्नीने मुंबईतील ब्रिटिश दुतावासाशी संपर्क साधला आणि याबाबत माहिती दिली. ब्रिटिश दुतावासाने तत्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने याबाबतची माहिती पवई पोलिसांना दिल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांनी या माहितीची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक अनघा सातवसे, बळवंत देशमुख, सहायक निरीक्षक सचिन वाघ यांच्या पथकाला कोलार्ड यांच्या घरी पाठवले. जवळपास दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर कोलार्ड यांचे मनपरिवर्तन करण्यात पोलिसांना यश आलं.


अतिरक्तदाबाचा त्रास

कोलार्ड यांना अतिरक्तदाबाचा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सॅम यांना मुंबई पोलिसांकडून वेळीच मिळालेल्या मदतीमुळे सॅम यांचे प्राण वाचल्यामुळे पोलिसांचे आभार मानण्यासाठी सॅम यांच्या पत्नीने गुरूवारी पोलिसांची भेट घेतल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांनी सांगितले.



हेही वाचा -

मुंबईत ४९९ इमारती धोकादायक, पालिकेनं जाहीर केली यादी

मालाड दुर्घटना: चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर होणार




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा