Advertisement

मालाड दुर्घटना: चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर होणार

मालाड दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतरचं ही भिंत कोसळण्यास ठेकेदार जबाबदार आहे, की मुसळधार पाऊस याबाबत स्पष्ट होणार आहे.

मालाड दुर्घटना: चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर होणार
SHARES

मालाड पूर्व, पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची संरक्षण भिंत झोपड्यांवर कोसळून २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराला महापालिकेनं गुरुवारी कारणे दाखवा नोटीस पाठविली. त्याशिवाय बांधकामाचा दर्जा, आराखडा आणि भिंत कोसळण्यामागचं कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतरचं ही भिंत कोसळण्यास ठेकेदार जबाबदार आहे, की मुसळधार पाऊस याबाबत स्पष्ट होणार आहे. त्यामुळं आता सर्वांच लक्ष चौकशी समितीचा अहवालाकडं लागलं आहे.

चौकशीनंतर कारवाई

मालाड येथील पिंपरीपाडामधील पालिकेच्या जलाशयाची संरक्षण भिंतीचं २०१७ मध्ये बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र, ही भिंत कोसळल्यामुळं बांधकामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी, पालिकेनं ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

बांधकाम २०१५ सुरू

या संरक्षण भिंतीचं बांधकाम २०१५ मध्ये सुरू केलं असून, २०१७ मध्ये पूर्ण झालं होतं. तसंच, या भिंतीचा हमी कालावधी २०२० पर्यंत आहे. त्यामुळं भिंत कोसळल्याप्रकरणी कारवाई का करू नये, असं महापालिकेनं ठेकेदाराला नोटीसद्वारे विचारलं. त्याचप्रमाणं, या नोटीसला ७ दिवस उत्तर देण्याची मुदत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी स्थापन समितीचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर होणार आहे.हेही वाचा -

बायोमेट्रिक यंत्रणेतील बिघाडामुळं पालिका कर्मचाऱ्यांना मिळतोय कमी पगार

अर्थसंकल्पातून बांधकाम क्षेत्राला काय गिफ्ट मिळणार?Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा