Advertisement

बायोमेट्रिक यंत्रणेतील बिघाडामुळं पालिका कर्मचाऱ्यांना मिळतोय कमी पगार

महापालिकेनं कामचुकार कर्मचाऱ्यांवर आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू केली असून, त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आली. मात्र, आता याच यंत्रणेमुळं कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत आहे.

बायोमेट्रिक यंत्रणेतील बिघाडामुळं पालिका कर्मचाऱ्यांना मिळतोय कमी पगार
SHARES

महापालिकेनं कामचुकार कर्मचाऱ्यांवर आळा घालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सुरू केली असून, त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आली. मात्र, आता याच यंत्रणेमुळं कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत आहे. या यंत्रणेमधील तांत्रिक बिघाडामुळं कर्मचाऱ्यांनी एकही सुट्टी न घेताही महिनाअखेरीस अनेक कर्मचाऱ्यांना हाती ८१ ते १०० रुपये पगार येतो आहे.

नाराजीचं वातावरण

या बायोमेट्रिक यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच या हजेरीतील घोळ दुरुस्त करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आलं आहे. अनेकदा इंटरनेट नेटवर्क नसल्यामुळं कर्मचाऱ्यांची हजेरीच लागत नाही. त्यामुळं यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनानं काही विभागांमध्ये जुन्या पद्धतीनं हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय, या बिघाडामुळं काही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात फक्त ८१ रुपये पगार जमा झाला असून, याचा फटका सफाई कामगारांना बसला आहे.

आग्रही मागणी

जानेवारी २०१९पासून बायोमेट्रिक हजेरी व सॅप प्रणालीच्या अपयशाचा फटका कामगारांना अनेकदा बसला आहे. पालिकेच्या गिरगाव येथील 'डी' विभागातील सुमारे ६० ते ७० टक्के कामगारांच्या जूनच्या वेतनात पुन्हा मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. याविरोधात बुधवारी दुपारी कामगार संघटनांनी कामगारांचे कापलेले पगार त्वरित खात्यात जमा करा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्यामुळं बायोमेट्रिक यंत्रणेच्या बिघाडामुळं कामगारांचे कापलेले पगार परत मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ९ जुलैला २ तासांसाठी बंद

वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या मुदतीत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा