Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ९ जुलैला २ तासांसाठी बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी असणारे माहिती-दिशादर्शक फलक बसवण्याच काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ९ जुलै रोजी मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक २ तास बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ९ जुलैला २ तासांसाठी बंद
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी असणारे माहिती-दिशादर्शक फलक बसवण्याच काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ९ जुलै रोजी मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक २ तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

१२ ते २ या कालावधीत

मंगळवार ९ जुलै रोजी दुपारी १२ ते २ या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे. या कामादरम्यान अवजड वाहनांसाठी पुण्याच्या दिशेनं जाणारी मार्गिका पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक वाहने एक्स्प्रेसवेवरील खालापूर टोलनाका व कुसगाव टोलनाक्यापूर्वी थांबवण्यात येणार आहेत.

जुन्या मार्गाचा वापर

त्याशिवाय, पुण्याला जाणारी हलकी चारचाकी वाहनं व इतर प्रवासी वाहनं ही एक्स्प्रेसवेवरील कुसगाव टोलनाका येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडं वळवण्यात येणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी २ तास जुन्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.   हेही वाचा -

अर्थसंकल्पातून बांधकाम क्षेत्राला काय गिफ्ट मिळणार?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा