वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या मुदतीत वाढ

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विविध विद्याशाखांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम २०१९-२० करिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रियेची मुदत वाढवली आहे.

SHARE

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. कारण, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विविध विद्याशाखांमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रम २०१९-२० करिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रियेची मुदत आणखी एका दिवसानं वाढवली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना राज्यातील संबंधित केंद्रांवर शुक्रवारपर्यंत मूळ कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे.

अतिवृष्टी झाल्यानं शक्य नाही

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र पडताळणी प्रक्रिया २९ जूनपासून सुरू झाली होता. ही प्रक्रिया गुरुवार ४ जुलैला संपली. मात्र, महाराष्ट्रात काही ठिकाणी या कालावधीत अतिवृष्टी झाल्यानं मूळ प्रमाणपत्र पडताळणी दिवशी केंद्रांवर उमेदवारांना पोहोचणं शक्य झालं नाही. तसंच, काही उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रं काही कारणास्तव त्यांच्या प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेच्या दिवशी सादर केली नाहीत. अशा उमेदवारांना मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी (रहिवासी प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्रे, नॉन क्रिमीलेअर) करून घेता येणार आहे.

आॅनलाइन अर्ज

वैद्यकीय पदवी प्रवेशाला विविध अभ्यासक्रमांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही. ते विद्यार्थी शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज करू शकणार आहेत. त्याचप्रमाणं ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, मात्र आॅनलाइन गेटवेमार्फत शुल्क भरले नाही त्यांना देखील ही संधी उपलब्ध असणार आहे.हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ९ जुलैला २ तासांसाठी बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या