रस्त्याचे पेव्हर ब्लॉकही चोरले !


SHARE

चेंबूर - वाशी नाका परिसरातील शंकर देऊळ येथे एका दुकानदाराने पालिकेचेच पेव्हर ब्लॉक चोरून दुकानाची भिंत बांधली आहे. येथील ओसवाल नाक्यावर हे दुकान असून या दुकानदाराने एका बाजूने नाला बंद करत अनधिकृतरीत्या दुकान थाटले. सध्या या परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक चोरून दुकानाची भिंत बांधण्याचे काम सुरू केले. याबाबत एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त हर्षद काळे यांच्याशी संपर्क साधला असता, असा प्रकार याठिकाणी सुरू असल्यास पालिकेकडून दुकानदारावर तत्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित विषय