विक्रोळीत नाल्यात मृतदेह सापडला

मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढला असून राजावाडी रुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला.

विक्रोळीत नाल्यात मृतदेह सापडला
SHARES

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण ताजं असताना आता नाल्यात आणखी एक मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. विक्रोळीमध्ये एका नाल्यात मंगळवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

विक्रोळी पूर्व येथील टागोरनगर ग्रुप नंबर ३ येथील नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना आढळला. या मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढला असून राजावाडी रुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला.

मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. ही आत्महत्या आहे, हत्या, घातपात की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. हा मृतदेह पुरुषाचा असून अंगावर निळा शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेली दिसत आहे. वय अंदाजे ४० ते ४५  आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घडत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा दहा दिवसांपूर्वी मृतदेह सापडला होता. अशातच आणखी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मृतदेह कुणाचा आहे हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.



हेही वाचा -

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर

वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनजवळ बोलक्या भिंती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा