उत्तन खाडीत सापडला तरूणाचा मृतदेह

 Ganesh Nagar
उत्तन खाडीत सापडला तरूणाचा मृतदेह

कांदिवली - उत्तन गावातल्या खाडीमध्ये तरूणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रवी पांडे असं या तरूणाचं नाव असून तो कांदिवलीच्या गणेश नगरमध्ये रहात होता. गेल्या चार दिवसांपासून तो घरातून गायब होता. मंगळवारी खाडीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कांदिवली पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी पांडे हा ड्रग्ज अॅडिक्ट होता. तो अनेकदा कित्येक दिवस घरातून गायब रहात होता. त्यामुळे त्याच्या घरचेही त्रासले होते. यावेळीही अशाचप्रकारे तो गायब झाला. प्रारंभी काही दिवस घरच्यांना दुर्लक्ष केले. मात्र चार दिवस परत न आल्यामुळे रवी पांडेचे नातेवाईक चिंतित झाले. मात्र मंगळवारी त्याचा मृतदेह सापडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.

Loading Comments