पाच वर्षीय मुलाचा वडाळ्यात संशयास्पद मृत्यू


पाच वर्षीय मुलाचा वडाळ्यात संशयास्पद मृत्यू
SHARES

मुंबईच्या वडाळा येथील शांती नगर परिसरात एका पाच वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तौसिफ नौशाद शेख (५) असं या मुलाचं नाव असून शांती नगर येथील खाडीमध्ये त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला. अद्याप या मुलाचा मृत्यू कशाने झाला ते समजू शकलेलं नाही.

गुरुवारी रात्री तौसिफ त्याच्या घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटपर्यंत त्याचा काही पत्ता लागला नाही. सकाळी ९ च्या सुमारास त्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याला तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

सांगितलं जातंय की गुरुवारी रात्री तौसिफचे कुटुंबिय वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याची प्रतिक्रिया त्याचे नातेवाईक शहनाज शेख यांनी दिली आहे.



हेही वाचा

अमरापूरकर मृत्यू प्रकरण : सिंघल समितीची महापालिकेला क्लिनचिट


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा