CCDचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू, नदीत सापडला मृतदेह

CCDचे या प्रसिद्ध कॉफी रेस्टॉरंट चेनचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ (६०) यांचा मृतदेह सापडला आहे. तब्बस ३६ तासांपासून ते बेपत्ता होते. बुधवारी पहाटे मंगळुरूमधील नेत्रावती नदीत सापडला आहे.

CCDचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू, नदीत सापडला मृतदेह
SHARES

CCDचे या प्रसिद्ध कॉफी रेस्टॉरंट चेनचे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ(VG Siddhartha(६०) यांचा मृतदेह सापडला आहे. तब्बस ३६ तासांपासून ते बेपत्ता होते. बुधवारी पहाटे मंगळुरूमधील (Mangaluru) नेत्रावती नदीत सापडला आहे. बेपत्ता असल्यामुळं सोमवारी संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरू होता. सिद्धार्थ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र, मृतदेह सापडल्यानं त्यांना आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बेपत्ता झाल्याची तक्रार

व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारी संध्याकाळच्या सुमारास बेंगळुरूहून मंगळुरूला येत असताना बेपत्ता झाले. प्रवासादरम्यान नेत्रावती नदीवरील (Nethravathi river) पुलाजवळ आल्यावर सिद्धार्थ मोटारीतून खाली उतरले, आणि 'मी फिरून येतो’, असं त्यांनी चालकाला सांगितलं. मात्र, तास उलटून गेले तरी सिद्धार्थ न परतल्यानं चालकानं पोलिसांना याबाबत माहिती देत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

मृत्यूचं कारण अस्पष्ट

चालकाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सिद्धार्थ यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोल, तटरक्षक दलासह विविध यंत्रणांच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी मंगळुरूतील होजी बाजाराजवळ नेत्रावती नदीच्या पात्रात सिद्धार्थ यांचा मृतदेह सकाळी ६.३० च्या सुमाराला तरंगत असल्याचं आढळून आलं. सिद्धार्थ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

विविध पथकांची मदत

व्ही. जी. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भारतीय जनता पक्षात असलेले एस. एम. कृष्णा (S. M. Krishna Former Chief minister of Karnataka) यांचे जावई आहेत. त्यांच्या तपासासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, तटरक्षक दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, सागरी पोलिसांची पथके सिद्धार्थ यांचा शोध घेत होते. काही स्थानिक मच्छीमारानांनाही शोधकार्यात सहभागी करून घेण्यात आल्याची माहिती मिळते.




हेही वाचा -

CCD चे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता, ३० हजार जणांच्या रोजगारावर कुऱ्हाड?

शॉर्ट सर्किटमुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा