Advertisement

CCD चे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता, ३० हजार जणांच्या रोजगारावर कुऱ्हाड?

‘कॅफे काॅफी डे’ (CCD) या देशातील प्रसिद्ध काॅफी रेस्टाॅरंट चेनचे संस्थापक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून अचानक बेपत्ता झाले आहेत.

CCD चे संस्थापक सिद्धार्थ बेपत्ता, ३० हजार जणांच्या रोजगारावर कुऱ्हाड?
SHARES

‘कॅफे काॅफी डे’ (CCD) या देशातील प्रसिद्ध काॅफी रेस्टाॅरंट चेनचे संस्थापक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. सिद्धार्थ यांनी उल्लाल येथील पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचीही चर्चा आहे. मंगळुरू पोलिसांनी तातडीनं त्यांचा शोध सुरू केला आहे.

नेमकं काय झालं? 

सिद्धार्थ सोमवारी  २९ जुलै रोजी  बंगळुरुला येत होते, त्याच दरम्यान संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ते कारमधून नेत्रावती नदीजवळ उतरले आणि त्यांनी ड्रायव्हरला कार पुढे घेऊन थांबण्यास सांगितलं. त्यानंतर फिरता फिरताच ते बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. ते बेपत्ता झाल्याची माहिती कळताच त्यांच्या निवासस्थानी हितचिंतकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचं बंगळुरुचे पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान सिद्धार्थ यांनी सीसीडीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना लिहिलेलं पत्रही समोर आलं आहे. अत्यंत निराश अवस्थेत लिहिलेल्या या पत्रात त्यांनी सीसीडीच्या अपयशाला स्वत: जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. 

 

काय आहे पत्रात?

या पत्रात सिद्धार्थ यांनी म्हटलं आहे की, मी अत्यंत मेहनतीने ३७ वर्षांमध्ये कंपनीची निर्मिती केली, ज्याद्वारे ३० हजार जणांना रोजगार मिळाला. एक चांगला ब्रँड निर्माण करण्यात मला यश आलं, असलं, तरी हा व्यवसाय वाढवण्यात मी अपयशी ठरलो आहे. प्रयत्न करूनही मला कंपनीला नफा मिळवून देता आलेला नाही. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची मी माफी मागतो.  

मी माझ्या मित्राकडून ६ महिन्यांपूर्वी मोठं कर्ज घेतलं होतं. हे कर्जही मला फेडता आलं नाही. त्यामुळे माझ्यावर प्रचंड दबाव आला आहे. परंतु मला आता हा दबाव सहन होत नाही. त्यामुळे नवीन संचालक मंडळाकडे सर्व व्यवहार सोपवण्याची वेळ आली आहे. मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही. केवळ एक व्यावसायिक म्हणून मी अपयशी ठरलो आहे. त्याबद्दल मी या पत्रातून सर्वांची माफी मागत आहे.   

रोजगारावर कुऱ्हाड

सद्यस्थितीत शेअर बाजारामध्ये सीसीडीचे शेअर्स २० टक्यांनी पडले आहेत. सीसीडीची वार्षिक उलाढाल ४ हाजार ३३१ कोटींहून (६८.९ दशलक्ष डॉलर) अधिक आहे. भारतातील २८ राज्यांमध्ये ‘सीसीडी’च्या १ हजार ७७२ शाखा सुरु आहेत. भारताबरोबरच ऑस्ट्रीया (व्हिएन्ना), चेक प्रजासत्ताक, मलेशिया, इजिप्त आणि नेपाळमध्येही ‘सीसीडी’च्या शाखा आहेत. सिद्धार्थ यांच्या या निर्णयामुळे कंपनीशी संलग्न ३० हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा-

मुंबई घाण करणाऱ्यांवर पोलिस नोंदवणार गुन्हे

दाऊदचा पुतण्या रिझवानसह तिघांना मोक्का



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा