दाऊदचा पुतण्या रिझवानसह तिघांना मोक्का

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकर याच्यासह दोन अटक आरोपींवर खंडणी विरोधी पथकाने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दाऊदचा पुतण्या रिझवानसह तिघांना मोक्का
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकर याच्यासह दोन अटक आरोपींवर खंडणी विरोधी पथकाने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ गुन्हे नोंदवण्यात आले असून ३ तक्रारदार मुंबईचे, तर २ गुजरातचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

म्हणून मकोका

एका व्यावसायिकाची फसवणूक करत त्याला धमकवल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने अहमद राजा अफरोज वधारिया, रिझवान कासकर, अशपाक रफिक टोपीवाला याला अटक केली. या गुन्ह्यात पोलिसांनी छोटा शकील आणि फहिम चमचम यांना फरार आरोपी घोषित केलं आहे. छोटा शकिलवर १०३, तर फहिम चमचम यांच्यावर ४० ते ४५ संघटीत गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळेच हे सर्व आरोपी संघटीत गुन्हेगारी टोळीचे सदस्य असल्याचं सांगत त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दाऊदशी संपर्क

रिझवान हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा मुलगा आहे. इक्बालच्या अटकेनंतर डी कंपनीची मुंबईतील सूत्र रिझवानने हाथी घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. पोलिसांच्या रडारवर न येण्यासाठी रिझवान वारंवार दुबईला जायचा. दाऊदचं कुटुंबिय आणि छोटा शकिल व फईम याच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याने दुबईतून वेगळा मोबाइल आणि सिम कार्ड घेतलं होतं. मात्र भारतात परतताना रिझवान हा मोबाइल दुबईतच ठेवायचा. त्यामुळे तो कुख्यात गुंडाच्या संपर्कात असल्याचं चाैकशीत समोर येत नसल्याचे चौकशीत पुढं आलं आहे. 

दाऊदशी बोलण्याचा प्रयत्न

दुबईच्या याच फोनवरून तो पाकिस्तानमध्ये असलेल्या दाऊद आणि त्याच्या पत्नी व मुलांशी संपर्क साधायचा. मात्र इक्बालच्या अटकेनंतर दाऊदने राजकीय दबाव लक्षात घेता मुंबईतील हस्तकांशी बोलणं बंद केलं होतं. अनेकदा रिझवानने दाऊदशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र दाऊद रिझवानला दाद न देता त्याच्याशी फोनवर बोलणं टाळायचा. त्यामुळे दाऊदपर्यंत मेसेज पोहचवण्याचं काम छोटा शकिल, फईम चमचम करायचे. दाऊद व्यतिरिक्त रिझवान, त्याची पत्नी आणि मुलांसोबत फोनवर बोलत असल्याचं चौकशीत पुढं आलं आहे. सोमवारी दुपारी रिझवानसह दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता त्याला मकोका अंतर्गत न्यायालयाने तिघांना ५ आॅगस्टपर्यंत कस्टडी सुनावली आहे.हेही वाचा-

दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरला अटक

अंडरवर्ल्डमध्ये व्हाॅट्स अॅप रेकाॅर्डिंगचा ट्रेंड


 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा