मातोश्रीवर फेक पार्सल घेऊन पैसे उकळणार्या कुरिअर बाँयला अटक

एका बड्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून नोकरी करायचा. धीरेन हा ग्राहकांच्या नावाने पार्सल तयार करून त्या पार्सलमध्ये कमी किमतीच्या वस्तू पॅक करायचा. ग्राहकांकडून त्या वस्तूंची मोठी रक्कम वसूल करायचा.

मातोश्रीवर फेक पार्सल घेऊन पैसे उकळणार्या कुरिअर बाँयला अटक
SHARES

राजकारणात मुंबईसह देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मातोश्री बंगल्यावर न मागवता पार्सल घेउन जात, आदीत्य ठाकरेंच्या नावाने पैसे उकळणार्यास खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. धीरेन मोरे (20) असे या आरोपीचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी त्याने चार वेळा या प्रकारे पार्सल पाठवून 'मातोश्री'च्या कर्मचाऱ्यांकडून अधिक पैसे उकळल्याचे समोर आले आहे. मात्र पाचव्यांदा त्याचा हा प्रयत्न फसला आणि त्याला तुरुंगात जावे लागले.

डिलेव्हरी देऊन उकळायचा डब्बल पैसे

धीरेन मोरे हा एका बड्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून नोकरी करायचा. धीरेन हा ग्राहकांच्या नावाने पार्सल तयार करून त्या पार्सलमध्ये कमी किमतीच्या वस्तू पॅक करायचा. ग्राहकांकडून त्या वस्तूंची मोठी रक्कम वसूल करायचा. धीरेनने सुरुवातीला लहानसहान ग्राहकांना फसवले. यानंतर त्याने थेट मातोश्रीवर मजल मारली होती. यापूर्वी त्यांने मोतोश्रीवर जाऊन चार वेळा खोट्या वस्तू फसवल्या आणि यात त्याला यशही मिळाले. मात्र पाचव्या वेळी तो अडकला. कमी किमतीचे हेडफोन्स आणि इतर साहित्य धिरेन याने जास्त रक्कम वसुल केली होती. मात्र आज चक्क आदित्य ठाकरेंशी त्याची गाठ पडली. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्याच्यावर खेरवाडी पोलीस ठाण्यात फडवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय मंञी रामदास आठवलेंना ही गंडा

आता फक्त आदित्य ठाकरेच नाही तर या पठ्ठ्याने यापूर्वी असाच प्रकार सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत केला होता. ऑर्डर न दिलेल्या वस्तू आरोपी लोकांपर्यंत पोहोचवून जास्त रक्कम वसूल करत होता. मात्र रामदास आठवले यांनी तक्रार केली. नंतर पोलिसांनी तपास करुन त्याला अटकही केली होती. 6 महिन्यापूर्वीच तो बाहेर आला होता. मात्र पुन्हा त्याने या कामांना सुरुवात केली. आज मातोश्रीवर हा सगळा थरार रंगला आणि पळून जाताना बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून खेरवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे असे काही पार्सल येत असतील तर जरा सावधगिरीने वागलेलं कधीही चांगलंच.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा