• धारावी हत्याकांड, भावानेच केली भावाची हत्या
SHARE

धारावी - येथे झालेल्या फायरिंग प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अवघ्या काही तासांत जेरबंद केल आहे. सनाउलहक हुसेन (27) असं या आरोपीचे नाव असून त्याने सोमवारी धारावीच्या संगम गल्लीत भाऊ जियाहुलहक हुसेन (32) याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सनाउलहकचा साथीदार अद्याप फरार आहे. तर पैशाच्या वादतून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

अशी पटली ओळख
सोमवार रात्रीपर्यंत मृत व्यक्तीची ओळखच न पटल्याने शेवटी पोलिसांनी त्या मृत व्यक्तीचा फोटो बिहारी नागरिकांच्या व्हॉट्सअॅपग्रुपमध्ये शेअर केला. त्यानंतर मृत व्यक्ती जियाउलहक हुसेन नावाचा एक सेट बनवणारा असल्याचं समजल्याचे अप्पर पोलीस आयुक्त आर. डी. शिंदे यांनी सांगितले.

मृत जियाउलहक हा बिहाराचा राहिवशी असल्याचं समजताच पोलिसांनी बिहारकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्यांची पडताळणी सुरू केली. यामध्ये जियाउलहकच्या एका भावाला पोलिसांनी सोबत घेतले आणि बिहाराच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या गाड्यांची तपासणी सुरू केली. पवन एक्स्प्रेसमध्ये स्लीपर कोचमध्ये एक व्यक्ती पोलीस हवालदार काळे यांना आढळला. या तरुणाला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी दुसऱ्या भावाला मृत जियाउलहकचे फोटो दाखवले असता हा आपला भाउच असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तात्काळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या तपासणीसाठी पवन एक्स्प्रेस 20 मिनिटे कल्याण स्थानकात थाबावण्यात आली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या