Advertisement

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी 'या' अभिनेत्रीची पोलिसांनी केली ७ तास चौकशी

नवी दिल्लीत एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये ती व्यस्त असल्याने ती मंगळवारी पोलिस ठाण्यात चौकशीस हजर राहिली.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी 'या' अभिनेत्रीची पोलिसांनी केली ७ तास चौकशी
SHARES
Advertisement

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी मंगळवारी वांद्रे पोलिसांनी सुशांतची ‘दिल बेचारा’ चित्रपटातील अभिनेत्री संजना सांघी हिची तब्बल ७ तास चौकशी केली. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट होता. खरतर संजनाला पोलिसांनी चौकशीसाठी सोमवारी बोलावले होते. मात्र नवी दिल्लीत एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये ती व्यस्त असल्याने ती मंगळवारी पोलिस ठाण्यात चौकशीस हजर  राहिली.

हेही वाचाः- Marathi compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय

सुशांतसिंह राजपूत याचा अंतिम शवविच्छेदन अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे त्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आत्महत्ये मागची सर्व कारणे पडताळणी जात आहेत.   या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.  सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.सुशांतच्या आर्थिक गुंतवणूक व  कंपनीत रिया चक्रवर्ती हिलाही पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुशांतसोबत शेवटात म्हणजेच ‘दिल बेचारा’ मध्येकाम करणारी अभिनेत्री  संजना सांघीला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स केले होते. पोलिसांनी संजनाला सोमवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र शुटींगच्या तारखेत व्यस्त असल्यामुळे संजनाने पोलिसांना मंगळवारी चौकशीला हजर राहणार असल्याचे कळवले. त्यानुसार संजना ही मंगळवारी पोलिस चौकशीला हजर राहिली होती. पोलिसांनी तब्बल ७ तास तिची चौकशी केल्यानंतर तिला जाऊ दिले. काही महिन्यांपूर्वी 'मी-टू कैम्पेन' सुरू असताना संजनाने सुशांतवर तिची छेड काढल्याचा आरोप केला होता. त्यावेळी तिने सुशांतसोबत चॅटचे फोटो ही सोशल मिडियावर  टाकल्याचे कळते.  त्यावेळी सुशांतने या आरोपाचे खंडन केले होते.

हेही वाचाः- Electricity Bill: ‘या’ कारणामुळे तुम्हाला आलंय जास्त लाईट बिल

 दरम्यान मंगळवारी सुशांतची बहिण आणि त्याचा मित्र महेश शेट्टी यांनी तपास अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे ही कळते. दोघांनी सुशांतच्या आत्महत्येचे कारण काही स्पष्ट झाले आहे का हे जाणून घेतल्याचे कळते. त्याच बरोबर सुशांतने आत्महत्या केलेल्या घरात तो भाड्याने रहात होता. त्या घराचे भाडे लाखोरुपये आहे. त्यामुळे ते घर म्हणजे च सुशांतच्या त्या घरातील वस्तू घेऊन ते घर खाली करण्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.  त्याच बरोबर सुशांतचे जे बँक अकांऊन्ट पोलिसांनी बंद केले आहेत. ते सुरू करण्याबाबत ही पोलिसांकडे विनंती केल्याचे कळते.

संबंधित विषय
Advertisement