दिलीप छाब्ररियाची बहिणाला अटक


दिलीप छाब्ररियाची बहिणाला अटक
SHARES

डीसी डिझाइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रीयाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. छाब्रीयाच्या गुन्ह्यात त्याच्या बहिणीचा सहभाग निश्चित झाल्यानंतर मुंबईच्या गुप्तवार्ता विभागाने छाब्रीयाची बहिण कांचन हिला बुधवारी अटक केली. छाब्रीया विरोधात २२ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला आहे. कार नोंदणी फसवणूक प्रकरणी यापूर्वीच गुप्तवार्ता (सीआययू) पथकाने अटक केली होती. तसेच आणखी एका अभिनेत्रीची दिलीप छाबरिया यांनी फसवणूक केली असल्याने छाबरिया विरोधात तक्रार देण्यासाठी ती पुढे आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२०१६ ते २०१८ च्या दरम्यान छाबरियाने एका ऑटोपार्ट विक्रेत्याकडून कारचे सुटे भाग खरेदी केली व त्याची रक्कम दिली नाही, असा छाबरियाविरोधात आरोपी आहे. या व्यावसायिक चेन्नई येथील रहिवासी आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे १८ कोटी रुपये येणे बाकी आहे, पण व्याज पकडून ही रक्कम २२ कोटींपर्यंत पोहोचते. नरीमन पॉईंट परिसरात एक बनावट नंबर प्लेट असलेली स्पोर्टस कार येणार आहे. त्यानुसार, सचिन वझे यांनी सापळा लावला होता. या कारच्या झडती घेतली असता, या कारवर बनावट नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याचा चेसी नंबर देखील बदलल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार छाबरियाचे बिंग फुटले. तसेच छाब्रीया याने त्याच्या कंपनीच्या माध्यमातुन १२० स्पोर्टस कार देश परदेशात विकल्या असुन, यातील सरासरी एका कारवर ४२ लाख एवढे कर्ज असल्याचे समोर आले आहे. तर यातील ९० कारमध्ये आर्थीक घोटाळा असुन, याचा अधिक तपास सुरु आहे.

त्यानुसार, पोलिसांनी ही कार ताब्यात घेत, ती बनविणा-या दिलीप छाब्रीयाला अटक केली होती. ही कार चेन्नई येथे रजिस्टर असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिकेटर दिनेश कार्तीक याने या कंपनीचा मालक छाब्रीया विरोधात न्यायालयात तक्रार केली होती. त्याने दिनेश कार्तीकला कार देतो असे सांगत ५ लाख रुपये अॅडव्हान्स घेतल्याचे देखील समोर आले होते. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया याने कॉमेडियन कपील शर्मालाचीही साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कपील शर्माचा याचा जबाब नोंदवण्यात आला. कपील शर्माने छाबरियारियाला महागडी व्हनिटी व्हॅन बनवण्यास सांगितले होते. त्याचे सर्व पैसे शर्माने दिले होते. पण त्याबदल्यात त्याला व्हॅन मिळालीच नाही. याप्रकरणी गेल्यावर्षी कपील शर्माने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. नुकतीच कार नोंदणीप्रकरणी दिलीप छाबरियाला अटक झाल्यानंतर त्याबाबतच्या बातम्या पाहून कपील शर्मा यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांना संपर्क साधला. त्याप्रकरणीही त्याला अटक झाली आहे. आता या नवीन प्रकरणामुळे छाबरियाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा