विनापरवाना फिरणाऱ्या 'फिल्मी' पोलिसांवर गुन्हा


विनापरवाना फिरणाऱ्या 'फिल्मी' पोलिसांवर गुन्हा
SHARES

मुंबई - पोलिसांच्या नावाची पाटी लावून आणि खाकी वर्दी घालून तीन वाहने विनापरवाना रस्त्यावरून फिरवल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एका प्रसिद्ध निर्माता कंपनीच्या तीन सहाय्यक दिग्दर्शकांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला. शुवंकर घोष, राज बिंदल आणि मनप्रितसिंग चढ्ढा अशी तिघांची नावे आहेत.
पश्चिम द्रुतगती मार्गावरून जात असलेल्या स्कॉर्पिआ, अॉडी आणि जिप्सी या 3 गाड्यांमध्ये काही माणसे पोलिसांच्या खाकी वेशात बसली आहेत. तसेच या गाड्यांवर बनावट नंबरप्लेट आणि पोलिसांच्या नावाची पाटी वापरण्यात आल्याचे खेरवाडीतील स्थानिक रहिवासी मिरज महाले यांनी रविवारी पाहिले. त्यांनी तात्काळ याची माहिती खेरवाडी पोलिसांना दिली. त्यानंतर खेरवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने या संशयास्पद गाड्यांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, या गाड्या टी सीरिज कंपनीच्या 'वजह तूम हो' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा