डॉक्टरनेच केला नर्सचा विनयभंग

टी.बी. रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातच काम करणाऱ्या नर्सनं डॉक्टरवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.

डॉक्टरनेच केला नर्सचा विनयभंग
SHARES

मुंबईच्या शिवडी परिसरातील टी.बी. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरनेच परिचरिकेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टर विरोधात परिचारिकेनं आर. . किडवाई पोलिस ठाण्यात 28 जानेवारी रोजी गुन्हा नोंदवला आहे. डाँ. अमर पवार असं या डाँक्टराचं नाव आहे. याप्रकरणी आर. . किडवाईचं पोलिस अधिक तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नवी मुंबई उलवे परिसरात राहणारी 32 वर्षीय परिचारिका शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करते. मागीलवर्षी म्हणजे १ जुलै २०१८ मध्ये पीडितेची बदली ही बालरुग्ण कक्षात करण्यात आली होती. 2 जुलै रोजी पीडित परिचारिका रात्रपाळीवर कार्यरत होती. यावेळी एका बालरुग्णाचा वाढदिवस असल्यानं त्याला शुभेच्छा देण्यासाठी परिचारिका रुग्णाच्या बेडजवळ गेली. त्याठिकाणी डॉ. पवारही उपस्थित होते. परिचारिकेनं शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे केल्यानंतर डॉ. पवार यांनी परिचारिकेचा हात धरत तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. डॉक्टरांनी संधी पाहून अनेकदा अशाप्रकारे गैरवर्तन केल्याचं ही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.

तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास नोकरी घालवण्याचीही धमकी दिली. ऐवढ्यावरच न थांबता डॉक्टरांनी काही रुग्णांच्या नातेवाईकांना परिचारिके विषयी खोट्या तक्रारी करण्यासही सांगितल्याचा आरोप परिचारिकेनं केलाय. रोजच्या त्रासाला कंटाळून परिचारिकेनं नोव्हेंबर महिन्यात डॉक्टर विरोधात आर. . किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात लेखी तक्रारी नोंदवली होती. अखेर 28 जानेवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी डॉ. अमर पवार विरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे.  


हेही वाचा

दिव्यांग व्यक्तीकडूनच साथिदाराची फसवणूक

धक्कादायक! एअर इंडियाच्या खाद्यपदार्थात झुरळ


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा